https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्राईम

कोरची येथील खुनाचा गुन्हा उघडकीस,आरोपींना अटक

गडचिरोली,प्रतिनिधी :-

पोलीस स्टेशन कोरची अंतर्गत दिनांक ०८/०१/२०२३ रोजी मौजा देवसुन कटेझरी जाणाऱ्या रोडवर सुमारे ५५ किलोमीटर पूर्व दिशेला एक अनोळखी मृतदेह मिळुन आला होता.. याचा तपास पोउपनि नरेश वाडेवाले करीत होते. सदरचा मृतदेह हा मृतक नामे मेहतर कुवरसिंग कचलाम, वय ५५ वर्षे, रा. पौरखेडा, तह. दुर्गकोंदल, जि. कांकेर (छत्तीसगड) याचे असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.

त्यास ग्रामीण रुग्णालय, कोरची येथे उपचारकामी दाखल केले असता, वैद्यकिय अधिकारी यांनी तपासून त्यास मृत घोषीत केले.

पोस्टे कोरची येथे मर्ग क्र. ०३ / २०२३ दाखल करण्यात आला होता.परंतू या मर्गबाबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना शंका असल्याने त्यांनी मर्गबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा यांना दिले.

एक महीण्याच्या अथक परिश्रमानंतर सखोल चौकशीअंती हा मर्ग नसुन, खून असल्याचे उघडकीस आल्याने संशयीत आरोपी नामे १) मुकेश बुधरुराम यादव, वय ३६ वर्षे, व्यवसाय – फॉरेस्ट गार्ड, रा. मानपूर, तह. मानपूर, जि. मानपूर – मोहला – चौकी (छत्तीसगड), २) सौरभ राजेंद्र नागवंशी, वय २७ वर्षे, व्यवसाय – चालक, रा. मानपूर, तह. मानपूर, जि. मानपूर मोहला – चौकी (छत्तीसगड), ३) रुपसिंग बाबुराव तुलावी, वय २७ वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. आमाकोडो, तह. मानपूर, जि. मानपूर – मोहला-चौकी (छत्तीसगड), ४) आसुराम देवजी तुलावी, वय ३६ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आमाकोडो, तह. मानपूर, जि. मानपूर-मोहला-चौकी (छत्तीसगड) यांनी संगनमत करुन कट रचुन मृतक मेहतर कुवरसिंग कचलाम यास पैसे परत न केल्याच्या कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने बळजबरीने चारचाकी वाहनाने पळवून नेवुन त्यास मारहाण करुन जिवानीशी ठार केले. 

तसेच मृतकाची मोटरसायकल हिचे चेसीस नंबर घासुन पुरावा नष्ट करुन घटनास्थळावर आणून टाकल्याचे सांगीतले. 

त्यावरुन गडचिरोली पोलीस दलाने वरील आरोपीतांवर पोलीस स्टेशन कोरची येथे अप क्र. १३/२०२३, कलम ३०२, ३६४, १२० (ब), २०१, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असुन, त्यांना अटक करण्यात आली व सदर अटक आरोपीतांना न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने चारही आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704