ताज्या घडामोडी

मुक्त विद्यापीठाच्या पेपर मूल्यांकनाचे मानधन मिळेना..? प्राध्यापकामध्ये नाराजीचा सूर

नांदेड(प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पेपर मूल्यांकन हे ऑनलाईन पद्धतीने झाले असून राज्यातील अनेक प्राध्यापकांनी पेपर मूल्यांकनाचे काम केले असून मागील चार महिन्यापासून मुक्त विद्यापीठाने संबंधित प्राध्यापकांना पेपर तपासणीचे मानधन न दिल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
नांदेड विभागीय केंद्रातील नांदेड लातूर परभणी हिंगोली या चार जिल्ह्यातून विविध पेपर मूल्यांकन केंद्रावर प्राध्यापकांनी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेचे मूल्यांकन हे ऑनलाईन पद्धतीने केली आहे.
यावर्षी विद्यापीठाने उत्तर पुस्तकाचे मूल्यांकन चांगले व्हावे यासाठी ऑनलाईन तपासणीमध्ये मोठे बदल केले होते.
पेपर मूल्यांकन करताना प्राध्यापकांनी आठ ते दहा तास पेपर तपासणीचे काम केले आहे.
जानेवारी महिन्यात विविध केंद्रावर पेपर तपासणीचे काम विद्यापीठाकडून देण्यात आले होते.
मागील चार महिन्यापासून प्राध्यापकांना थेट खात्यावर पेपर मूल्यांकनाचे मानधन दिले जाईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे परंतु अद्यापही विद्यापीठाच्या दुर्लक्षितपणामुळे पेपर मूल्यांकन करूनही प्राध्यापकांना मानधन मिळालेले नाही. नांदेड विभागीय केंद्रातील प्राध्यापकांना मानधन न मिळाल्यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मानधन त्वरित न मिळाल्यास याबाबत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे प्राध्यापकांनी म्हटले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.