ताज्या घडामोडी

सरपंच, ग्रामसेवक व एजेंट यांच्या मनमानी कारभारामूळे मानोली येथील दोन बेरोजगार युवकांचा मानवतच्या तहसीलमध्ये आत्महत्याचा प्रयत्न*

*मानवत / प्रतिनिधी .*

मानोली मानवत तालुक्यातील मानोली येथील ग्राम रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर खोदकाम मजुराच्या साह्याने न करता शेतकऱ्या कडून अतिरिक्त पैसे घेऊन जेसीबीच्या साह्याने खोदकाम करीत आहेत यासाठी संतोष सदाशिव शिंदे व सुरेश बालासाहेब मांडे राहणार मानोली येथील रहिवासी असून मोजे मानोली ता मानवत येथील रोजगार सेवक व सरपंच व काही एजंट हे एकमेकाशी संगणक करून मजुराच्या साह्याने विहिरीचे खोदकाम न करता शेतकऱ्याकडून अतिरिक्त पैसे घेऊन जेसीबीच्या साह्याने खोदकाम करीत आहेत त्यामुळे मजुराच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे मजुरावर उपासमारीची वेळ येत आहे तसेच काही वय वृद्ध मजुरांची देखील नावे लेबर कार्ड मध्ये टाकण्यात आली आहेत त्यामुळे ग्रामसेवक सरपंच व काही एजंट यांची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व मजुरांना रोजगार मिळवून देण्यात यावा असे पत्र दिनांक 15 /4/2024 रोजी गटविकास अधिकारी कार्यालय मानवत यांना देण्यात आले होते अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर दिनांक 2/05/2024 रोजी आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असे एका पत्राद्वारे गट विकास अधिकारी कार्यालय मानवत यांना कळविण्यात आले होते पण माहिती असून सुद्धा अधिकाऱ्यांनी या याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याची दिसत आहे तर यामध्ये सिंचन विहिरीच्या कामांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याची दिसत आहे आज एक वाजता मानवत तहसीलच्या दालनामध्ये जाऊन सुरेश मांडे व संतोष शिंदे यांनी विषारी औषध पिऊन आपले जीवन संपण्याचा प्रयत्न केला तात्काळ जवळ असणाऱ्या नागरिकांनी त्यांना मानवत येथे शासकीय रुग्णालयात नेण्यात आले व त्यांच्यावर काही उपचार करताच पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय परभणी येथे नेण्यात आले

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.