कै.प्रकाश हट्टेकर स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळवाटप करून स्मृतिदिन साजरा.

नवीन नांदेड.दि.१३प्रकाश प्रतिष्ठान पोटा (बु) ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील
कै.प्रकाश हट्टेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त
महात्मा गांधी निवासी अपंग विद्यालय सिडको येथे
प्रा. डॉ. विजय हट्टेकर सर यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासत
दिव्यांग विद्यार्थ्यांना फळ व शैक्षणिक साहित्य
वाटप करून.स्मृतिदिन साजरा केला. या वेळी
कै.प्रकाश हट्टेकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष
प्रा. डॉ. विजय हट्टेकर यांनी उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की
कै.प्रकाश हट्टेकर हे एक उच्चशिक्षित व्यक्तिमत्व होते.
व त्यांनी छत्रपती संभाजी नगर येथे नोकरी करून आपल्या मुलांना व आम्हा भावंडांना शिक्षणाची प्रेरणा दिली. म्हणून दरवर्षी प्रमाणे आम्ही त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवितो.
व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणून विद्यार्थ्यांनी खचून न जाता संकटाला सामोरे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. डॉ. विजय हट्टेकर, सौ. अनुजा हट्टेकर, श्रीमती विमल हट्टेकर, जयंत हट्टेकर, गणेश माने, दिलीप चव्हाण,वेणूताई कलाने,
डॉ. गणेश इजळकर,प्रा. शशिकांत हाटकर, डॉ. दत्ता खरात, रमेश भास्करे, शंकर सुरेवाड, यांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. गणेश ईजळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर सुरेवाड यांनी मानले. या वेळी सदरील कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
अनाठाई खर्च टाळून दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळवाटप वाटप करून
एक आगळा वेगळा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल सदरील कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



