जय हिंद पब्लिक व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य पदी ज्योती स्वामी यांची निवड

उदगीर प्रतिनिधी :येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य पदी ज्योती स्वामी यांची निवड करण्यात आली. त्यानिमित्त संस्थेच्या वतीने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या हस्ते नवनियुक्त प्राचार्या ज्योती स्वामी यांचा सत्कार करण्यात आला.
ज्योती स्वामी ह्या उत्तम शिक्षक, प्रशासक म्हणून मागील 15 वर्षापासून शाळेत कार्यरत आहेत.त्यांचे उदगीर शहरांत सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात देखील मोठे योगदान राहिलेले आहे. त्यांची शिक्षणा बरोबरच प्रशासनावर देखील उत्तम पकड आहे. यावेळी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ. गणेश तोलसरवाड, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, जय हिंद पब्लिक स्कूलच्या उपप्राचार्या रिंग्नम विश्वकर्मा यांनी आपले अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.
त्यांच्या निवडीबद्दल संस्थेच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुख स्नेहा लांडगे, उपप्राचार्य दिग्विजय केंद्रे, उपप्राचार्य प्रिन्सीं बी, राष्ट्रीय सेवा योजनांचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अमर तांदळे, पत्रकारिता व परीक्षा विभाग प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, सतीश वाघमारे, धोंडीबा शिंदे, पटवारी सर, मंगेश भालेराव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार मनोरमा शास्त्री यांनी मानले.



