ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते *धम्मचारी पद्ममित्र ग्यानोबा व्यवहारे* यांचे निधन
जि. प. चे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांना पितृशोक

आज दुपारी ४ वाजता नांदेड येथे अंत्यसंस्कार
नांदेड, (प्रतिनिधी)- नांदेड येथील गणेशनगर वाय पॉईंट परिसरातील कांचनमृग अपार्टमेंट येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ग्यानोबा सटवाजी व्यवहारे (वय ८०) यांचे आज सोमवार, दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता वाजता निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून दीर्घ आजाराने त्रस्त होते. नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ग्यानोबा व्यवहारे यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागात आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून कार्य केले होते. ते सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही सामाजिक व आंबेडकरी चळवळीशी कायम सक्रिय राहिले. त्रिरत्न बौद्ध महासंघात त्यांना धम्मचारी पद्ममित्र ही उपाधी मिळाली होती. त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी अनेक प्रवचने दिली होती.
त्यांच्या पश्चात चार मुली, दोन मुलं, सुना तसेच नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे व पंचशील हायस्कूलमधील सहशिक्षक आनंद व्यवहारे यांचे ते वडील होत.
त्यांच्या पार्थिवावर आज दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता नांदेड येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.