सुजाण आणि नीतिमान नागरिकांसाठी समाजशास्त्र हे उपयोजित शास्त्र: डॉ. सुभाष पवार
यशवंत महाविद्यालयात पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियान(PM USHA) योजनेअंतर्गत पदवी व पदव्युत्तर समाजशास्त्र विभागाकडून विद्वत व्याख्यानाचे आयोजन

दिनांक 12 /09/2025
यशवंत महाविद्यालयात पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियान(PM USHA) योजनेअंतर्गत पदवी व पदव्युत्तर समाजशास्त्र विभागाकडून विद्वत व्याख्यानाचे आयोज
नांदेड येथील श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित यशवंत महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर समाजशास्त्र विभागाकडून पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियान या अंतर्गत एका विद्वत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .सदरील व्याख्यान श्री दत्तात्रय पुसदकर महाविद्यालय नांदगाव पेठ, जिल्हा अमरावती येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख व प्राध्यापक डॉ सुभाष पवार यांनी दिले.
PM-USHA या योजनेअंतर्गत महाविद्यालयात समाजशास्त्र एक उपयोजित शास्त्र व संशोधन पद्धती अशा दोन सत्रांमध्ये हे व्याख्यान आयोजित करण्यात आले या व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य व माजी प्र- कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड डॉ गणेश चंद्र शिंदे हे उपस्थित होते. सुजाण आणि नीतिमान नागरिकांसाठी समाजशास्त्र हे उपयोजित शास्त्र आहे वर्तमान समाजात कमी होत चाललेली नीतिमत्ता लोकांमध्ये कायम ठेवण्यासाठी हे शास्त्र अत्यंत उपयुक्त आहे घटत चाललेली सामाजिकता आजच्या समाजासमोरचे मोठे आव्हान आहे व ते आव्हान पेलण्याची क्षमता केवळ समाजशास्त्रात आहे अशा अनेक बाजूंनी मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व्याख्यानासाठी समाजशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील व्याख्यानात महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले विभागाचे विभाग प्रमुख डॉ.बी एम कांबळे विभागातील प्राध्यापक डॉ.बी आर भोसले तसेच प्रा.शंकर मार्कड व प्रा पूजा मिरगेवार या कार्यक्रमाला उपस्थित होते संगीत विभागाचे विभाग प्रमुख डॉ शिवदास शिंदे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती या कार्यक्रमाची सूत्रसंचालन डॉ बी आर भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा शंकर मार्कड यांनी केले