https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

महावितरण मधील यंत्रचालकांची वेतन तफावत दुर करा.: विजय रणखांब

राज्यस्तरीय मेळाव्यात मार्गदर्शन.

नांदेड
महावितरण मधील यंत्र चालकांची वेतन तफावत ही मानवनिर्मित झालेली असल्याने व 2005पासुन यंत्रचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणून महावितरण प्रशासनाने तातडीने वेतन तफावत दूर करावी व यंत्रचालकाना न्याय द्यावा अशी मागणी छत्रपती संभाजी नगर येथे यंत्र चालकाच्या झालेल्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे नांदेड झोनसचिव विजय रणखांब यांनी मागणी केली आहे.
वीज उद्योगातील उपकेंद्रांत काम करणाऱ्या महावितरणच्या यंत्रचालकांचे राज्यस्तरीय मेळावा ५ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. या मेळाव्यासाठी राज्यभरातून बाराशे यंत्रचालकानी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली.
मेळाव्यात वीज यंत्रचालकांचे प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यातील रणनीती आखण्यात आली. महावितरण ऑपरेटर बचाव कृती समितीच्या अधिपत्याखाली झालेल्या मेळाव्यामध्ये ऑपरेटरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वच संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेचे अध्यक्ष सुधाकर जायभाये, सरचिटणीस नवनाथ पवार, वीज तांत्रिक कामगार युनियनचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे, सरचिटणीस सय्यद जहीरुद्दीन, विद्युत तांत्रिक तांत्रिक कामगार युनियनचे शिवाजी शिवनेचरी, स्वाभिमानी विद्युत वर्कर्स फेडरेशनचे विवेक महाले, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे नांदेड झोनसचिव विजय रणखांब , स्वतंत्र बहुजन विद्युत कर्मचारी संघटनेचे सुनील टिप्परसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्ताविक नवनाथ पवार यानी केले.


महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळांचे विभाजनानंतर ऑपरेटर कॅडर वर आर्थिक अन्याय झाला आहे. नोकरीत लागताना समान वेतन परंतु सेवा पुढे गेल्यानंतर इतर पदांच्या तुलनेत निर्माण झालेली मानवनिर्मित वेतन तफावत दूर करणे, कंपनी कारणांमुळे पदोन्नती चैनेल विस्कळीत झाल्याने निर्माण झालेली वेतन तफावत, सहाय्यक कर्मचाऱ्यांचा पहिल्या तीन वर्षांचा कंत्राटी कालावधी सेवाकाळ म्हणून ग्राह्य धरणे, सन २०१९ नंतरची उपकेंद्रे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठी खुली करणे, महाराष्ट्रातील सर्वच वीज उपकेंद्रे अपडेट करून वीज ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी कर्मचारी संघटनांनी क्रमबद्ध दीर्घ स्वरूपाच्या उपाययोजनांवर चर्चा केली.

आर्थिक विषयाशी संबंधित वेतन ॲनामलीच्या प्रश्नावर वीज प्रशासन वेतन वाढ करार करताना प्रश्न सोडवू, याप्रमाणे आश्वासन देत आले आहे. परंतु वेळोवेळी या प्रश्नाला बगल देत असल्याने ऑपरेटरांमध्ये तीव्र व संतापजनक नाराजी निर्माण झालेली आहे. या साठी निर्माण केलेली कमिटी ऐकून घेण्यापलीकडे काहीही करत नाही. त्यामुळे आता २०२३ चा वेतन वाढ करार करण्याअगोदर ऑपरेटरांचा वेतन तफावतीचा विषय निर्णयांकित करावा, अशी मागणी करण्यात आली.
तसे न झाल्यास दुसरे नियोजन काय असावे, याबाबत पुढील आठ दिवसात निर्णय घेतला जाणार असल्याचे नवनाथ पवार यांनी कळवले आहे.
सुत्रसंचलन रमेश शिंदे तर आभार गोतराम यांनी मानले .
मेळावा यशस्वी करण्यासाठी विश्वास साळुंके, संजय उगले, रामनाथ नागरगोजे, प्रफुल्ल शेळके, हिरालाल पाटील, रमेश वडगावे, धोंडीराम गोत्राम, श्रावण कोळनूरकर, सुशील तुपे, उत्तम पाटोळे, ज्ञानेश्वर चामले, संजय तांबटकर, महेश गुळवे, निवृत्ती नागरे, कैलास पायघन आदींनी परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704