ताज्या घडामोडी

मानवत नगर परिषदेच्या गलथान कारभाराच्या विरोधात *शिवसेने सह महाविकास आघाडीने रणशिंग फूंकले.

शहरप्रमूख अनिल जाधव यांचा न.पा. प्रशासनाला आंदोलनाचा ईशारा.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत नगर परिषदेच्या गलथान कारभारा विरोधात शिवसेनेसह महाविकास आघाडीने रणशिंग फूंकले असून त्या संबंधीचे निवेदन मा मुख्यधिकारी ,प्रशासक न.प मानवत यांना महाविकास आघाडीचे वतीने आज निवेदन देण्यात आले मानवत शहरांमध्ये ज्या ठिकाणी दलितवस्ती आहे. मोंढा परीसर, आंबेडकर नगर. बौद्ध नगर इतर ठिकाणी नाल्या , परिसर स्वच्छता करने, कचरा गाडी इतर कोणत्याही प्रकारची सुविधा गेल्या अनेक दिवसा पासून नाही. या परिसरात सफाई कामगार दिसायला तयार नाही. त्यामुळे दलित वस्ती परिसरात घाणिचे साम्राज्य पसरलेले आहे. वारंवार अधिकारी यांना तोंडी सांगून सुद्धा स्वच्छता

या भागाची स्वच्छता करण्यात येत नाही.
तसेच गेल्या अनेक दशका पासून मानवत नगर परिषदेच्या पाणिपूरवठा विभागात शहरातील शहरात नळ प्लंबर हे मागच्या 15 ते 17 वर्षांपासून न.पा.मानवत चे अधिकृत प्लंबर असून ते सतत काम करीत असतात.परंतु मागील 9 महिन्यापासून सर्वच प्लंबर चे लाखो रूपयांचे बिल जे की मुख्याधिकारी यांच्या आदेशाने पाणी पुरवठ्याचे निघालेले काम प्लंबर यांनी केलेले आहे. पण मानवत नगर पालिका प्रशासन जाणीव पूर्वक सर्व प्लंबर चे बिल देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे सर्व प्लंबर आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. तर अनेकांच्या घरची परिस्थिती बेताची आहे, तसेच अनेकांना दवाखाना सुध्दा करावा लागत आहे. तर न.पा. प्रशासन मनमानी करून त्यांची बिल देण्याचे टाळून बाहेरील लोकांना ज्यांना पाणी पुरवठा काम करण्याचे अनुभव नाही अशा आपल्या मर्जीतील लोकांना कामाचे आदेश देत आहे. त्यामुळे मानवत शहरात भर पावसाळ्यात 10 ते 15 दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत नाही.
तसेच जागोजागी नाल्यामध्ये पाईप फुटून नाली मधील घाण पाणी पाईपलाईन मध्ये जात आहे. त्यामुळे ज्या वेळेस पाणी सुटेल त्यावेळेस नळाला घाण पाणी येऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. मानवत शहरात रोगराई पसरू शकते.
जुम्मन प्लॉट येथे मागच्या वर्षभरा पासून नळाला पाणी येत नाही त्यामुळे तेथील नागरिकांची पाहण्यासाठी भटकती होत आहे.पाणिपूरवठा अधिकार्‍याच्या मनमानी कारभार व वरिष्ठांचा वर्दहस्तामूळे मानवत शहरातील सर्वच अधिकृत प्लंबर चे बिले जाणीव पूर्वक दिल्या जात नाहीत.
दलित वस्ती येथील स्वच्छता, नळ प्लंबर यांचे बिले व जुम्मन प्लॉट येथील पाणीपुरवठा या सर्व बाबी येणाऱ्या 8 ते 10 दिवसात पूर्ण न झाल्यास शिवसेने सह महाविकास अघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडन्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी या निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख अनिल जाधव , CITU जिल्हा सचिव रामराजे महाडीक , महिला जिल्हा अघाडी प्रमुख ( RPI ) कांता गवळी , उपशहरप्रमुख शिवाजी सोरेकर , नंदू पाटील , अनिल दहे , गिरी महाराज , पांडुरंग जाधव , कुंडलीक थिटे , युनूस कुरेशी , नवनाथ गुद्दटवार , शेषेराव धूमाळ , गणेश गिराम , शंकर बागडे , विनायक बालकूंड , ओमकार निन्हाळ , परमेश्वर मुळूक , गजानन इंगोले , अशोक परड , योगेश दसरथे , बापूराव दसरथे , यशोदा , अनिता , सुनिता , आशामती , नुरजहॉ , जुलेखाबी , सुनिल कोटेवार यांच्या स्वाक्षरी आहेत .

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.