ताज्या घडामोडी

के.के.एम. महाविद्यालया मध्ये आज चक्रधर स्वामी अवतार दिवस, व डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी.

मानवत / प्रतिनिधी.

आज श्री चक्रधर स्वामी अवतार दिवस व डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून के.के.एम महाविद्यालयात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,
आज दि. 5/09/24 रोजी के. के. एम.महाविद्यालयात शिक्षक दिन आणि श्री चक्रधर स्वामी अवतार दिवस साजरा करण्यात आला. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे उपस्थित होते.तर अध्यक्षीय समारोप डॉ. भास्कर मुंडे यांनी केले. संयोजक डॉ. विनायक जाधव यांनी प्रास्ताविक केले तर आभार डॉ. कन्हैयालाल पाटोळे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के.जी. हुगे, पर्यवेक्षक श्री.अनिल कापसे, मूल्य शिक्षण समिती प्रमुख डॉ.पंडित लांडगे आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.