ताज्या घडामोडी

अतिवृष्टी मध्ये वाहून गेलेल्या बालाजी लेदर मर्चेंटचा महसूल प्रशासनाने केला नूकसानीचा पंचनामा

*

मानवत / प्रतिनिधी.

दिनांक १ सप्टेबर ते ३ संप्टेब रोजी मानवत तालूक्यात अतिवृष्टी झाली त्यामूळे अनेकांचे अतोनात नूकसान झाले. तर मानवत नगर परिषदेच्या परिश्रेत्रात असलेल्या नगर परिषदे जवळील वालीबाचा मळा या भागात असलेल्या *सुदाम कांबळे* यांचे बालाजी लेदर मर्चेंट चे अतिवृष्टी मुळे मोठे नूकसान झाले. शूज शोरूम मध्ये पूराचे पाणि शिरून मालासह साहित्याचे मोठे नूकसान झाले तर काही साहित्य व सामान वाहून गेल्यामूळे मोठे अर्थीक नूकसान झाल्यामूळे कांबळे यांच्यावर अर्थीक संकट कोसळे आहे. या संबंधीची तक्रार प्राप्त होताच मानवत सज्जाचे महसूलचे तलाठी व पंच यांनी नूकसानीचा अंदाज घेऊन पंचनामा केला.

सविस्तर वृत्त असे की,
मानवत नगर परिषदेच्या परिसरात अतिवृष्टी झाल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणि शिरले तर वालीबाच्या परिसरात असलेल्या बालाजी लेदर मर्चेट या शुज होलसेलरचे मोठे नूकसान झाले. अतिवृष्टीमूळे साहित्य भिजले तर अतिवृष्टीमूळे मोठ्या प्रमाणात वाहून गेले. त्यामूळे मोठे अर्थीक नूकसान झाल्याने शहरात हळ हळ व्यक्त केल्या जात आहे. तर आज मानवत सज्जाचे महसूलचे तलाठी यांनी पंचा लोक यांच्या समोर नूकसानीचा पंचनामा केला. *सुदाम सखाराम कांबळे* यांच्या बालाजी लेदर मर्चेट (शुज होलसेल) दुकान येथे हजर होऊन प्रत्येक्ष झालेल्या घटनेचा उद्‌देश सांगितला की, सुदाम सखाराम कांबळे यांच्या बालाजी लेजर मर्चेड (शुजचे) दुकान चे अतिवृष्टी मुळे दि. 01/09/2024 ते 03/09/ 20025 च्या मुसळधार पाऊसा मध्ये बालाजी लेदर मर्चेटचे मालक सुदाम सखाराम कांबळे यांच्या दुकानात पाणी शिरूण मोठ्या प्रमाणात सामान भिजलेले दिसुन आले. प्रत्यक्ष जाय मोक्यावर पाहणी केली असत्ता पंचासमक्ष पाहणी करूण मोठ्या प्रमाणात झालेल्या नूकसानीचा पंचनामा करण्यात आला

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.