ताज्या घडामोडी

नेताजी सुभाष विद्यालयामध्ये *मराठवाडा मूक्तिसंग्राम दिन साजरा

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षणसंस्थेच्या नेताजी सुभाष विद्यालया मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मानवत येथे दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सर्वांच्या उपस्थितीत साजरा करण्यात. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक उद्धवराव हारकाळ , मा. शिवराज नाईक पर्यवेक्षक विश्वनाथ बुधवंत संजय लाड प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाषराव डख
यांच्या शुभहस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयाचे उपमूख्याध्यापक उद्धवराव हारकाळ पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सदाशिव होगे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामावर आपले विचार मांडले.माणिकराव सिसोदे यांनी राष्ट्रगीत गायले. कार्यक्रमानंतर महावाचन चळवळ हा उपक्रम घेण्यात आला.
यासाठी ग्रंथपाल विठ्ठलराव काकडे पाटील , यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.