आरोग्य व शिक्षण

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व मुलींसाठी दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

नांदेड दिनांक(संपादक राज गायकवाड): तायक्वादो असोसिएशन ऑफ नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्यासह तायक्वॉदो असोसिफशन ऑफ महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष राहिलेले नागपूर चे पोलीस आयुक्त डॉ . रवींद्र कुमार सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त १० दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अशोक नगर नांदेड येथे व रुद्रा डिफेन्स अकॅडमी विष्णुपुरी येथे करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण दिनांक २० ते २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान देण्यात येणार आहे . नांदेड जिल्ह्यात तायक्वांदो असोसिफशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष पद भूषविताना महिला खेळाडूंसाठी तसेच महिलांना स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून विविध शिबिराचे आयोजन डॉ . रविंद्र सिंगल यांनी केले होते. डॉ .स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर राबविण्यात त्यांचे फार मोठे योगदान लाभले आहे. डॉ. रवींद्र सिंगल यांच्या जन्मदिनानिमित्त मास्टर तायक्वॉदो मार्शल आर्ट स्कूल अशोक नगर नांदेड येथे सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान व रुद्रा डिफेन्स अकॅडमी विष्णुपुरी नांदेड येथे सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान हे प्रशिक्षण महिला व मुलींना मोफत स्वरूपात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मास्टर बालाजी पाटील जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येणार आहे .इच्छुक महिला व मुलींनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तायक्वांदो मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या वतीने डॉ . हंसराज वैद्य , सुभाष डाकोरे , फरिद लालामिया , नंदकुमार घोगरे , संजय चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले आहे . अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी ९४२०६७३३९४ वर संपर्क करण्यात यावा असे आयोजकाच्या वतिने कळविण्यात येत आहे .

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.