एमजीएम कॉलेज येथे नेत्र तपासणी शिबीर.

नांदेड दिनांक 22: एमजीएम कॉलेज ऑफ कंप्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या NSS युनिटने लायन्स क्लब नांदेडच्या सहकार्याने २० मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी आणि कर्मचारी सदस्यांसाठी नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केले. लायन्स नेत्र रुग्णालयाच्या अत्याधुनिक साधनसामग्रीसह डॉ. सुप्रिया भंडारे, श्री. अमोल पवळे आणि राम शिंदे (दोन्ही ऑप्टोमेट्रिस्ट) यांच्या पथकाने १२५ हून अधिक विद्यार्थ्यांची आणि कर्मचार्यांची डोळ्यांची तपासणी केली.
हा शिबिर डॉ. सुनिल डाहाळे NSS समन्वयक आणि प्राध्यापक सुशांत बोलवार यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आले.
या आयोजना बाबत महात्मा गांधी मिशन संस्थेचे अध्यक्ष श्री.कमल किशोर कदम, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाटकर, महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ ऑफ कंप्युटर सायन्स आणि आयटीचे प्राचार्य डॉ. शिरीष कोटगीरे, उपप्राचार्या डॉ. कांचन नांदेडकर, बायोइन्फॉर्मेटिक्स विभागाचे प्रमुख डॉ. चेरकर, बीसीए विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता भोपी, बायोटेक्नोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. गोंड धनंजय बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉर्मेटिक्स विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद चेरेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.