राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचा समारोप

नांदेड प्रतिनिधी:येथील एम जी एम’स कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड आई. टी. नांदेड व इंदिरा गांधी महाविद्यालय, नवीन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दि २६/०१/२५ ते ०१/०२/२५ या कालावधीत मौजे वरखेड येथे आयोजित केलेल्या ७ दिवसीय शिबिराचा समारोप दि ०१/०२/२५ रोजी झाला.
या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इ.गा. म. चे प्राचार्य डॉ.घायाळ होते तर मुख्य अतिथी एम जी एम’स कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड आई. टी. नांदेड च्या उपप्राचार्या डॉ. कांचन देशमुख, चंपतराव सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला एम जी एम’स कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड आई. टी. नांदेडच्या विद्यार्थ्यांनी स्त्री पुरुष समानतेवर पथनाट्य सादर केले.
या ७ दिवसीय शिबिराच्या यशस्वितेसाठी रासेयो चे कार्यक्रमाधिकारी डॉ.सुनील डहाळे डॉ .भागवत पस्तापुरे , डॉ.विशाल मस्के आनि प्रा.सुशांत बोलवार यांनी परिश्रम घेतले.