स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंगचे वार्षिक स्नेह संमेलन दीप प्रज्वलनाने साजरा

—————————————–
उदगीर :-येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शै.वर्ष 2024-25 चे वार्षिक स्नेह संमेलन दीप प्रज्वलन सोहळ्यानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुण कदम, फरिदा राठोडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, संस्थेचे एच आर मॅनेजर अनिश जेट्ठी, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, फलोरेंस नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नागसेन तारे,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश तोलसरवाड,जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे,अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री,स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शेषनारायण जाधव, उपप्राचार्य सतीश वाघमारे, रासेयो चे कार्यक्रमाधिकरी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, विद्यार्थी परिचारिका संघटनेचे उपाध्यक्ष श्रीनिवास नामवाड, महिला प्रतिनिधी निकिता साखरकर हे उपस्थित होते.
सदरील दीप प्रज्वलन सोहळात विद्यार्थ्याना परिचारिकेची शपथ प्रा.स्वाती येवडगे यांनी दिली. तर आभार प्रा. नागसेन तारे यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रिन्सी बी, प्रा.संगीता सगर, प्रा. वैष्णवी मोरे, श्रीकांत स्वामी, जयपाल भिंगे, लक्ष्मण थेवरे, बालाजी कदम, नरसिंग जानके, सुरेश पवळे, शकुंतला कांबळे, योगेश काळे यांनी परिश्रम घेतले.