करिअर कट्टा कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

नांदेड: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेला करिअर कट्टा उपक्रमांतर्गत एक हात मदतीचा मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय राहुलजी कर्डिले साहेब , यांच्या हस्ते करण्यात आले करिअर कट्टा गेल्या चार वर्षापासून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन करते त्याचबरोबर मराठवाड्यात वर आलेले हे अस्मानी संकटात सापडले शेतकरी शेतमजूर त्यांच्या पाल्यासाठी काहीतरी देणे लागतो म्हणून करिअर कट्ट्याच्या आव्हानाला महाराष्ट्रभरातून महाविद्यालय व प्राध्यापकांनी करिअर कट्टा यांच्या सर्वांनी मिळून मदत केली यातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले
प्रसंगी प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण, प्राचार्य डॉ दिलीप काकडे, प्राचार्य डॉ एस बी अडकीने,विभागीय समन्वयक डॉ सतिश चव्हाण, जिल्हा समन्वयक डॉ.श्रीकांत दुलेवाड , व सर्व तालुका समन्वयक डॉ नागेश ढोले, डॉ सचिन तावडे, डॉ आगे, डॉ गोविंद पांचाळ, डॉ.संतोष शेंबाळे, प्रा.प्रशांत टाके डॉ सूरज पांचाळ, डॉ ओमप्रकास कदम, डॉ.एकनाथ पावडे , डॉ.किशोर दवणे व नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी हे उपस्थित होते