ताज्या घडामोडी

यशवंत महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी):
यशवंत महाविद्यालय, पदव्युत्तर
अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्र नांदेड यांच्या वतीने. डॉ शंकरराव चव्हाण मेमोरियल, यशवंत महाविद्यालय परिसर येथे १३ व १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद “जागतिक परिक्षेत्राच्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेचे रूपांतरण : कृत्रिम बुद्धिमत्ता, नवप्रवर्तन व शाश्वत विकास.” त्या महत्त्वाच्या विषयावर संपन्न होणार आहे,

सदरील परिषदेत जागतिक स्तरावरील नामवंत विषयतज्ञ, शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, आणि शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर प्र कुलगुरु डॉ. अशोक महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


प्रमुख वक्त्यांमध्ये कतार विद्यापीठ, कतार येथील डॉ. किशोर सदासिवुनी, मलेशियातील सुलोमान समूहाचे कार्यकारी संचालक तथा डोनट अर्थशास्त्राचे प्रवर्तक मुहम्मद इकबाल नुरूल हक, नॅशनल ॲग्रो फूड अँड मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूट (NABHI), मोहाली पंजाब येथील नामवंत शास्त्रज्ञ डॉ. शिवराज निळे, मुंबई विद्यापीठाचे प्रा.डॉ. कोठे सत्यनारायण, गोखले इन्स्टिट्यूट, पुणे येथील प्रा.डॉ. नरेश बोडखे, तसेच राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी (NAARM), हैदराबाद येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. फिरोज तसेच प्राध्यापक डॉक्टर मोहम्मद माणिक (तेलंगणा) आणि प्राध्यापक राजलक्ष्मी आर (केरळ,)यांचा समावेश आहे.

या परिषदेचे संयोजक डॉ. जी. एन. शिंदे असून संयोजक सचिव डॉ. पी. आर. मुठे आहेत. परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, नवप्रवर्तन, शाश्वत विकास, जागतिक अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील परिवर्तन व धोरणे या विषयांवर चर्चा होणार आहे

या परिषदेसाठी मलेशिया कतार दक्षिण कोरिया अमेरिका या देशाशिवाय केरळ कर्नाटका आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू दिल्ली पश्चिम बंगाल राजस्थान आसाम पंजाब हरियाणा अंदमान निकोबार मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र या 15 पेक्षा अधिक राज्यातील 400 पेक्षा अधिक संशोधक व अभ्यासक सहभागी होणार आहेत
परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक यांना जागतिक पातळीवरील विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे. नांदेडमध्ये होणारी ही परिषद शैक्षणिक क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. ही परिषद यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख डॉक्टर पी, आर, मुठे डॉ डी डी भोसले, डॉक्टर डी ए पुपलवाड डॉ प्रवीणकुमार सेलूकर डॉ. संतोष पाटील, डॉ. शिवराज आवाळे
प्रा राहुल लिंगमपल्ले हे परिषदेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.