यशवंत महाविद्यालयात “Soft Skills” विषयावर अतिथी व्याख्यान

नांदेड – यशवंत महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामार्फत पी.एम. उषा योजनेंतर्गत चालविण्यात येत असलेल्या “Soft Skills in English Communication and Public Speaking” या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी २२ सप्टेंबर २०२५ रोजी “Soft Skills” विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि सार्वजनिक बोलण्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत करणे हा होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणात आजच्या स्पर्धात्मक युगात सॉफ्ट स्किल्सचे वाढते महत्त्व अधोरेखित करत इंग्रजी विभागाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
मुख्य अतिथी म्हणून डॉ. शिवाजी मेटे, सहाय्यक प्राध्यापक, मुंबई यांनी उपस्थित राहून “सॉफ्ट स्किल्स”च्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील भूमिकेवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी प्रभावी संवाद, संघभावना, वेळ व्यवस्थापन, सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, भावनिक बुद्धिमत्ता आणि नेतृत्वगुण या घटकांच्या जोपासनेवर भर दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी अभ्यासक्रम समन्वयक डॉ. कैलास इंगोले यांनी आभार प्रदर्शन केले. या उपक्रमात १०७ विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले व त्यांनी अतिथी वक्त्यांशी थेट संवाद साधला. कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासासाठी तसेच भविष्यकालीन यशासाठी उपयुक्त ठरला.