ताज्या घडामोडी

विष्णुपुरी येथे वर्षवास समारोप व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापनेचा कार्यक्रम सोहळा

नांदेड:( दि.१० ऑक्टोबर २०२५)
विष्णुपुरी येथील नालंदा व सुजाता बुद्ध विहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिरूपाची (पुतळा) स्थापना व बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा वाचन समारोप सोहळा, रविवार, दि.१२ ऑक्टोबर रोजी ११ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा राज्याचे माजी राज्यमंत्री मा.संजयजी बनसोडे उपस्थित राहणार असून सदरील कार्यक्रमात विश्वशांती बुद्ध विहार, उदगीरचे पूज्य भदंत नागेसेनबोधी थेरो व नाशिकचे पूज्य भंते धम्मरत्न थेरो हे उपस्थितांना धम्मदेसना देणार आहेत.
यशवंत महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागप्रमुख तथा आंबेडकरी चळवळीतील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ.गौतम दुथडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात अन्य प्रमुख अतिथी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूतगिरणी पेठशिवणीचे चेअरमन डॉ. सिद्धार्थ भालेराव, आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम, विश्वशांती बुद्ध विहार समिती, उदगीरचे सचिव उपा.दिलीपभाऊ सोनकांबळे तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. रवी सरोदे यांच्यासह ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.ओमकांत चिंचोलकर, एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी कॉलेजचे अधिष्ठाता प्रा.डॉ.शुभानंद हटकर, माजी नगरसेवक महेंद्र पिंपळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी नांदेड परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका यांनी मोठ्या संख्येने सदरील कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समिती व समस्त विष्णुपुरीवासीयांकडून करण्यात येत आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.