सुरत येथील जलतरण स्पर्धेत प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांना पदकांची प्राप्ती

नांदेड:( दि.१० ऑक्टोबर २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना वीर नर्मदा साउथ गुजरात विद्यापीठ, सुरत येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तीन सिल्वर पदक प्राप्त झाले आहेत.
प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांनी १०० मीटर बॅकस्ट्रोक, ५० मीटर बॅकस्ट्रोक आणि ५० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत सिल्वर मेडल प्राप्त करून यश संपादन केले आहे.
या सुयशाबद्दल माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी यथोचित सत्कार करून भविष्यातील स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, पर्यवेक्षिका प्रा. वंदना बदने, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल.व्ही. पद्मारानी राव, डॉ.साहेब शिंदे, प्रा.माधव दुधाटे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, क्रीडा संचालक डॉ.मनोज पैंजणे, प्रा. राहुल टिचकुले, प्रा.उत्तम केंद्रे, डॉ.वीरभद्र स्वामी, प्रा.नरेंद्र कंचटवार, लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर, डॉ. मुकेश धर्मले, डॉ.बी.जी.देशमुख, डॉ.एकनाथ मिरकुटे, प्रा. सचिन अपस्तंभ, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, सेवानिवृत्त वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रीरंग बोडके, सेवानिवृत्त वनाधिकारी गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किशोर गुंजकर, श्रीकांत गुंजकर, बालाजी गाडे, प्रा. एस. डी. बोकारे, प्रा.एस.एम. कुलकर्णी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.