ताज्या घडामोडी

महिला डॉक्टरचा आत्महत्येचा थरारक प्रकार — पोलीस उपनिरीक्षकासह दोन जणांविरुद्ध बलात्कार व छळाचा गुन्हा

फलटण (जि. सातारा), दि. २५ ऑक्टोबर :
फलटण शहर हादरवणारी घटना घडली आहे. स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये आत्महत्या केली असून, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकर या दोघांवर गंभीर आरोप केले आहेत.

सुसाइड नोटमध्ये डॉक्टरने स्पष्टपणे नमूद केले आहे की, उपनिरीक्षक गोपाळ बडणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून तिला वारंवार लैंगिक छळास बळी पाडले असून, चार-पाच वेळा जबरदस्तीने बलात्कार केला. त्याचप्रमाणे, तिचा परिचित प्रशांत मंकर याने तिला मानसिक त्रास देऊन तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला. या दोघांच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्येचा मार्ग तिने स्वीकारला, असे त्या पत्रात म्हटले आहे.

घटनास्थळी मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे फलटण पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार, अत्याचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी डीवायएसपी स्तरावर सुरू केल्याची माहिती दिली. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, परंतु योग्य कारवाई न झाल्याने ती मानसिकदृष्ट्या खचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेने सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय तसेच महिला संघटनांनी या प्रकरणात निष्पक्ष आणि जलद चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, डॉक्टरने आत्महत्येपूर्वी काही मित्रांना फोन करून “मी आता जगू शकत नाही” असे म्हटल्याची माहितीही समोर आली आहे. तिच्या कुटुंबियांनी पोलीस प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.