महात्मा गांधी मिशन्स कॉलेज ऑफ कंप्युटर सायन्स येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा संपन्न.

नांदेड दिनांक: (संपादक राज गायकवाड) महात्मा गांधी मिशन्स संचलित कॉलेज ऑफ कंप्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नांदेडच्या वतीने दि.१८ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे आयोजन दोन प्रमुख श्रेणीत केले होते. इंजिनीयरिंग आणि टेक्नॉलॉजी, तसेच लाइफ सायन्स. या प्रकल्प स्पर्धेत कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगाना व इतर राज्यातील ७८ टीम्सने सहभाग घेत विविध मानव उपयोगी प्रकल्प सदर केले. प्रत्येक श्रेणीतील प्रथम तीन विजेत्या टीम्सना १०,००० रुपये (प्रथम पारितोषिक), ७,००० रुपये (द्वितीय पारितोषिक), आणि ५,००० रुपये (तृतीय पारितोषिक) प्रमाणे रोख पारितोषिक व सहबागी सर्व टीमला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करणात आले.
या स्पर्धे मध्ये विविध शाळेय टीमने पण सहभाग नोंदवला याटीम मधून चार शालेय टीम्सना प्रत्यकी २,००० रुपये उत्तेजनार्थ चार पारितोषिक मिळविले.
या स्पर्धेचे मूल्यांकन डॉ. शिवनाथ रूमा (गुलबर्गा विद्यापीठ), डॉ. सतीश कुलकर्णी (गव्हर्नमेंट इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, औरंगाबाद), डॉ. काशिनाथ भोगले (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) आणि डॉ. आशिष गुळवे (असोसिएट प्रोफेसर, टेक्नॉलॉजी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड) यांनी केले.
या स्पर्धेचे समन्वयक प्रा. एम.डी. मुक्तार आणि प्रा.संतोष शिंदे यांनी केले. विद्यार्थी समन्वयक म्हणून लक्ष्मीकांत बाचाटे, सचिन भगत, गुंजन देशमुख, युवराज चव्हाण, सुफियान खान, निखिल रेड्डी, जय कुमार सोनी, सागर मोरे, सई देशमुख, आणि अबोली परघणे यांनी योगदान दिले.
या स्पर्धेचे योजन यशस्वीपणे करणाऱ्या सर्व टीमचे संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, अभिंयात्रिकी महाविद्यालयाचा संचालिका डॉ.गीता लाटकर,कॉलेज ऑफ कंप्युटर सायन्सचे प्राचार्य डॉ.शिरीष कोटगीरे, उपप्राचार्या डॉ. कंचन नांदेडकर, बायोइन्फॉर्मेटिक्स विभाग प्रमुख डॉ. मकरंद चेरेकर, बीसीए विभाग प्रमुख डॉ. स्मिता भोपी, आणि बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. धनंजय गोंड तसेच सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.