ताज्या घडामोडी

डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या ‘नवी लिपी’ कवितासंग्रहास नामदेव ढसाळ पुरस्कार जाहीर

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक तथा लेखक – कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या अलीकडेच दुबई येथे प्रकाशित झालेल्या ‘नवी लिपी’ कवितासंग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा यंदाचा नामदेव ढसाळ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘नवी लिपी’ ह्या कवितासंग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची कलात्मक नोंद घेणाऱ्या व कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कविता समाविष्ट आहेत.
डॉ. राजेंद्र गोणारकर यांचा हा दुसरा कवितासंग्रह असून त्यांची ‘निळे आकाश’, ‘सूर्यपक्षी’, ‘मराठवाड्यातील आंबेडकरी प्रबोधन पर्व’, ‘दलित पॅंथर : सम्यक आकलन’ आदि तेरा पुस्तके प्रकाशित आहेत.
येत्या 30 मार्च रोजी नागपूर येथे विशेष समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे व सरचिटणीस डॉ. प्रकाश करमाडकर यांनी पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.