ताज्या घडामोडी

यशवंतमध्ये “संशोधन प्रकल्प आराखडा तयार करणे” या विषयावर गेस्ट लेक्चर

नांदेड: प्रतिनिधी
श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचालित यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे ‘संशोधन प्रकल्प आराखडा तयार करणे’ या विषयावर पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 18 सप्टेंबर रोजी एक विशेष गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रंजीत धर्मापुरीकर यांनी उपस्थितांना संशोधन प्रकल्पाच्या प्रभावी आराखड्याचे महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक तंत्रांबद्दल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांच्या मते, प्रत्येक विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी दर्जेदार आणि समाजोपयोगी संशोधन करणे ही काळाची गरज आहे. मंचावर उपस्थित असलेल्या उपप्राचार्या डॉ. कविता सोनकांबळे यांनीही सर्वांना शुभेच्या दिल्या.
डॉ. रंजीत धर्मापुरीकर यांनी संशोधनाच्या विविध टप्प्यांवर कसे नियोजन करावे, संशोधनाचे शीर्षक निवडण्यापासून ते प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीपर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले. त्यांनी संशोधन लेखनाचे योग्य स्वरूप कसे असावे याविषयीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे उपस्थितांना संशोधन प्रक्रियेत उत्तम आराखड्याचे महत्त्व समजून घेण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक डॉ. अजय टेंगसे, इंग्रजी विभाग, आणि प्राध्यापक डॉ. संजय ननवरे, अध्यक्ष, संशोधन समिती, यशवंत महाविद्यालय, नांदेड यांनी केले होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. माधव दुधाटे, इंग्रजी विभाग यांनी केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.