ताज्या घडामोडी

सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदिर मानोली येथे शिक्षकदिन साजरा

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील सरदार वल्लभभाई पटेल विद्या मंदीर येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात आला.
या वेळी प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी .एन. जाधव व सर्व शिक्षक वृंद यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. डी.जे. राऊत यांनी केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती श्री .डी.एन.जाधव , श्री .के.व्ही.जाधव, श्री.एल.एन.पौळ,प्राप्ती हारबळे, महेश कदम यांनी दिली.
सिध्दी शिंदे व आरती मांडे यांनी शिक्षकांचा गौरव करणारे सुंदर गीत गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी हरकळ व वैष्णवी शिंदे यांनी केले.शेवटी आभार प्रदर्शन श्री.जी.पी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.