ताज्या घडामोडी

संभाषण कौशल्य व्यक्तिमत्त्व विकासाचा अविभाज्य घटक… डॉ. रामेश्वर सोळंके

नांदेड: दि. १२, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, इंग्रजी विभाग आयोजीत “मीट विथ अकॅडमी एक्सपर्ट” या उपक्रमांतर्गत “कम्युनिकेशन: स्टेपिंग स्टोन टू लाईफलॉंग सक्सेस” या विषयावर बोलत असताना संभाषण कौशल्य हे कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असुन सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये संभाषण कौशल्य हा अविभाज्य घटक बनला आहे. विदयार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमांबरोबरच संभाषण कौशल्य आत्मसात केल्यास यशाचा मार्ग अधिक सुकर होऊन संभाषण कौशल्य व्यक्तिमत्त्व विकासाचा अविभाज्य घटक आहे असे प्रतिपादन खरे-ढरे-भोसले कॉलेज गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथील प्रा. डॉ. रामेश्वर सोळंके यांनी केले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्र. प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी यांची तर प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ. जे. एस. मसुरे, डॉ. एस. बी. फड, प्रा. के. जे. कांबळे, डॉ. आय. ए. खाण यांची उपस्थिती होती. मान्यवरांचा सत्कार झाल्या नंतर डॉ. संदीप काळे यांनी या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दीली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. रामेश्वर सोळंके यांनी पुढे बोलतांना संभाषण कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचे असून इंग्रजी भाषा ही काळाची गरज आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करणे हे नितांत आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोस्ताहित करून इंग्रजी भाषा ही जागतिक ज्ञानाचे स्त्रोत आहे त्यामुळे आज बरेच पत्रव्यवहार इंग्रजी भाषेतून होतात सर्वांना इंग्रजी समजली पाहिजे, इंग्रजी बोलता आले पाहिजे असे प्रतिपादन करून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच फायदा होईल असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप काळे यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रा. छाया कोंगेवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. आय. ए. खाण, डॉ. शीतल सावंत, सेजल देशमाने, यासेर शेख आदींनी परिश्रम घेतले

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.