ताज्या घडामोडी

मोबाईल व्यसनमुक्ती साठी एच.ए.आर.सी. संस्थेने उचलले मोलाचे पाऊल.

जिल्हा परिषद प्रशालेला एच.ए.आर.सी. संस्थे कडून 101 पुस्तकांचा आनंदी खजाना भेट

मानवत / प्रतिनिधी.
मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर आणि वाढता स्क्रीन टाईम मुळे शाळेतील व गावातील ग्रंथालये ओस पडली. त्यामूळे ग्रंथालयातील निराधार पुस्तके वाचक रुपी माय-बाप यांच्या प्रतीक्षेत आहेत अशा परिस्थितीत शालेय मुलांनी शाळेतील ग्रंथालय यातील पुस्तकांशी मैत्री करून पुस्तक वाचनाचा आनंद घेण्याची वेळ आली आहे.
म्हणून आज 06 सप्टेंबर रोजी मानवत येथील जिल्हा परिषद प्रशालेला 109 विविध विषयाची आनंदी वाचनपेटी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे भेट देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवनजी चांडक, बालसाहित्यिक माणिक पुरी, तुकाराम साळुंके हे या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवनजी चांडक यांनी वाचनाचे महत्व सांगत घरातील टीव्ही व मोबाईलचा वापर कमी करून वाचनाकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन केले. या वेळी देण्यात आलेल्या’आनंदी वाचन पेटी’ मध्ये 101 पुस्तकांचा खजिना असून यामध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, महापुरुषांची चरित्रे, शास्त्रज्ञांची चरित्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेत हे साहित्य आहे.

*लोकसहभाग* सेलू येथील स्व. सत्यनारायण मंत्री यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमा निमित्ताने ही आनंदी वाचनपेटी भेट देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ पवनजी चांडक हे यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांनी ते बोलत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ पवन चांडक मुख्याध्यापिका श्रीमती छाया गायकवाड, श्री तूकाराम साळुंके सर, श्री सुनिल चौधरी सर, श्री अब्दूल मुजीब अब्दूल रौफ , श्री दत्तात्रेय होगे सर, कल्पना देशपांडे, सौ प्रियंका दुमाने, सौ सपना राऊत मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी गिरी मामा यांनी परिश्रम घेतले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.