ताशाचा आवाज तर्रर्रर्र झाला अनं गणपती आमचां नाचत आला…
शहरात गणरायाचे ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या थाटामाटात आगमन
मानवत / प्रतिनिधी.
आज शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी. गणेश चतुर्थीला सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती बाप्पांची प्रतिष्ठापना भावाक भक्तांनी मोठ्या थाटामाटात केली आहे.
तर मानवत शहरात लाडक्या बाप्पांच्या स्वागता साठी मानवत नगरी सजली तर बाल गणेश मंडळासह मोठ्या गणेश मंडळानी सर्वत्र जय्यत तयारी केली.
शहरात शनिवारी सकाळ पासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती मोठ्या ढोल ताशाच्या गजरात आणल्या जात आहेत. मानवत शहरात सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पांच्या मूर्ती नेण्यासाठी गणेश भक्तांची वर्दळ सुरु होती. पारंपारिक वाद्याच्या दणदणाटात मंडळाचे बाप्पा मंडपाकडे रवाना झाले.
गणेश मूर्ती स्टॉलवर बाप्पांच्या आरती व भक्तीगीतांचा जागर सुरु होता. त्यामुळे बाजारपेठ मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तर मानवत शहरासह सर्व बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने ओसंडल्या आहेत. बाजारपेठांसह अवघ्या वातावरणातच गणेशोत्सवाचा उत्साह संचारला आहे. हा उत्साह पुढील अकरा दिवस कायम राहणार आहे.
***