ताज्या घडामोडी

चर्मकार समाज बांधवांना गटाई स्टाल वाटप करा!राज्यउपाध्यक्ष-> नरहरी सोनवणे.

चर्मकार बाॅधवांना गटई स्टाल वाटप करा ! राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी.

मानवत / प्रतिनिधी.

जिल्हातील चर्मकार बांधवांना आपला व्यवसाय करण्यासाठी शासन स्तरावर स्टाल पूरविले जाते पण गेल्या दोन वर्षा पासून समाज बांधवांची मागणी होऊन गटई कामगाराना तात्काळ स्टाल पूरविण्याची मागणी मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, परभणी यांच्याकडे दिनांक ५ /०९/२०२४ रोजी करण्यात आली असून चर्मकार बांधवांना गटई स्टाॅल वाटप करावे अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ व समाज कल्याण कार्यालया मार्फत गटई स्टॉल सन २०१८-१९ मधील प्रलंबित स्टाॅल आजपर्यंत पुर्ण वाटप झालेले नाही. जवळपास ८२ गटई स्टॉल आजही प्रलंबित आहे. २०२१ ला गटई स्टॉल आलेले आहेत. परंतु २०२२,२०२३, २०२४ मध्ये एकही गटई स्टॉल आले नाहीत व वाटप देख झालेले नाहीत. तरी आपणास विनंती करण्यात येत आहे की, आपण मंजुर केलेले गटई स्टाॅल तात्काळ वाटप करण्यात यावेत व गटई कामगारांना न्याय देण्याची भुमिका आपण घ्यावी. अशी मागणी राष्ट्रीय चर्मकर महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात येत असून आपल्या .कार्यालयाकडून गटई कामगारांना न्याय न दिल्यास राष्ट्रीय चर्मकर महासंघ निर्देशनाचा ईशारा या निवेदनाच्या मार्फत देत आहे. २०१८-२०१९ मध्ये मंजुर झालेले गटई स्टॉल पुर्ण वाटप केलेले नाहीत व आपल्या मार्फत कोणत्याप्रकारची कार्यवा पाठपुरावा केला याबाबत स्पष्ट करावे.आयुक्त समाज कल्याण, यांनी तात्काळ वाटप करण्याची कारवाई करावी अन्यथा *लोकशाही* मार्गाने आंदोलन करावे लागेल असा ईशारा
राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे यांनी दिला आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.