ताज्या घडामोडी

येणारा भविष्यकाळ हा भौतिकतेला महत्व देणारा असेल पंडित अशोकजी पारीख.

मानवत / प्रतिनिधी.

भौतिक जीवन हे आपले शरीर क्षण करणारा आहे. उपवास केल्याने आपणास शक्ती प्राप्त होते.तर भौतिकतेमुळे आपली शक्ती हीन होते.
येणारा भविष्यकाळ हा भौतिक केला महत्त्व देणारा असेल.
असे विचार आयोध्या श्रीराम मंदिर बांधकाम समितीचे कोषाध्यक्ष परमपूज्य श्रध्देय, श्री गोविंद गिरीजी महाराज यांचे शिष्य पुणे निवासी पंडित अशोकची पारीख यांनी येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात *गीत गुंजन महिला ग्रुप व राजस्थानी मंडळ महिला मंडळ* यांच्या संयुक्त विद्यमाने.दि.23 ते 29 जुलै दरम्यान श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले.
श्रीमद् भागवत कथेचे कथावाचक प्रवक्ता या नात्यांनी त्यांनी कथेच्या माध्यमातून आपल्या विचार व्यक्त करताना ते म्हणाले.
प्रारंभी दि. 23 जुलै रोजी सकाळी 8, वाजता माहेश्वरी मंगल कार्यालयापासून पोलीस स्टेशन कटारी गल्ली गोदू गल्ली मुख्य मार्गाने लक्ष्मीनारायण मंदिर पर्यंत श्रीमद् भागवत ग्रंथाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभा यात्रेमध्ये राजस्थानी महिला मंडळाच्या सदस्या व गीत गुंजन ग्रुपच्या सर्व सदस्या सौ.आशाताई चांडक,सौ. संगीताताई तिवारी,सौ.कौशल्याताई मंत्री, सौ सिमाताई सारडा, सौ. विजयाताई बांगड, सौ. अनिताताई काबरा,सौ. अर्चनाताई बाहेती, सौ विजयाताई बांगड, सौ. प्रितीताई लड्डा, सौ, जयाताई राठी, सौ सुरेखाताई सोमाणी, व महिला त्या बरोबर श्रीमद् भागवत कथेचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमद् भागवत कथेच्या माध्यमातून द्वारे आपले विचार व्यक्त करताना पंडित श्री अशोकजी पारिख यांनी आपले विचार व्यक्त करताना ते पुढे म्हणाले. भक्ती शास्त्र किती आहे हे तर्क नाही. आपल्याकडे पैसा किती आहे घर बंगले किती आहे याची आपण मोजणी करतो. उपवास वृत्त केल्याने आपल्या शक्ति प्राप्त होते. तर भौतिकतेमुळे आपली शक्ती ऊर्जा कमजोर बनते.
आजच्या परिस्थितीमध्ये समाजात वाईट व्यसनाने अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून या बरोबर वाईट व्यसनामुळे आजची तरुण पिढी ही बरबाद होत आहे. वाईट व्यसनाच्या आहारी गेल्याने व्यसन आपले भोग भोगत आहे वाईट व्यसनाच्या पायी आपले जीवन नष्ट करू नका. व्यसनाच्या जास्त आहरी गेल्याने आपण व्यसनाचा त्याग करू शकत नाही. भागवत ग्रंथ गीता व इतर धार्मिक ग्रंथांचे पठण करून ते आचरणात आणा. यामुळे आपल्या जीवनाचे कल्याण होईल. आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी ईश्वर नाम स्मरण हे महत्त्वाचे साधन असून याद्वारे आपले जीवन धन्य करून घ्या. सत्संग करा आवश्यक आहे. भागवत ग्रंथाचे रचियता महर्षी व्यास यांनी भजना जवळील व्यास गुफेमध्ये श्रीमद् भागवत कथेची रचना गणपतीच्या साह्याने केली. या श्रीमद् भागवत कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माच्या व इतर लीलाचे वर्णन करण्यात आलेले आहे.
श्रीकृष्ण जसे शृंगार करतो तसे आपणही शृंगार करतो. एका कवीने सुंदर लिहिले आहे.
*मांग भरणे की सजा कुछ इस तरह पा रहा हू*
*मांग भरणे के बाद मांग मांग कर खा रहा हू*
आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी संतांनी आपल्याला मार्गदर्शन केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपले जीवन धन्य करून घ्या. असे विचार पंडित श्री अशोकजी पारिख यांनी येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात गीत गुंजन महिला ग्रुप व राजस्थानी महिला मंडळ च्या संयुक्त विद्यमाने श्रीमद् भागवत कथेच्या आयोजन प्रसंगी आपले अनमोल विचार व्यक्त करताना सांगितले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.