ताज्या घडामोडी

मा.अजित,दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्यांकडून शालेय मूलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील उक्कलगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की मानवत तालूक्यातील मौजे उक्कलगाव येथील प्रताप पिंपळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व श्री तुकाराम गोंगे समता परिषद तालुका अध्यक्ष यांच्या सह पवन पिंपळे कृष्णा पिंपळे गोविंद टाकळकर अनिल पांचाळ ज्ञानेश्वर शिंदे कृष्णा शिंदे आसाराम टाकळकर राजेश पिंपळे बळीराम गोंगे हनुमान पिंपळे प्रभाकर पिंपळे गजानन प्रथमेश पिंपळे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उक्कलगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही- पेन वाटप करून उपमुख्यमंत्री मा. ना. श्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदी व चैतन्याचे वातावरण होते. प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मायादेवी गायकवाड यांच्या सह शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.