ताज्या घडामोडी

शहीद सैनिकांच्या परिवारा बाबत सन्मान व सहानुभूतीची भावना जोपासली पाहिजे-:लेफ्टनंट डॉ.आर. पी. गावंडे

नांदेड: प्रतिनिधी

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय सैन्य दलाने अनेक लढाया आणि युद्ध सदृश्य मोहिमा लढलेल्या आहेत या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर सैनिक वीरगती प्राप्त होत असतात. वीर मरण पत्करून देशासाठी शहीद होत असतात .या शहीद सैनिकांना फक्त हार तुरे घालून, श्रद्धांजली अर्पण करून भागत नाही, तर या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी शहीद सैनिकांच्या परिवारा बाबत वीर माता ,वीर पिता ,वीर पत्नी यांच्याबाबत अपार सहानुभूती, मदत आणि सन्मानाची भावना जोपासली पाहिजे . असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील लेफ्टनंट डॉ. आर. पी. गावंडे यांनी केले आहे .
कारगिल विजय दिनानिमित्त यशवंत महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते .
प्रारंभी यशवंत महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गणेश चंद्र शिंदे यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली व त्यांना पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले .कार्यक्रमाचे प्रस्ताविक एनसीसी विभागाचे कार्यवाहक श्रीकांत सोमठाणकर यांनी केले . याप्रसंगी एनसीसी कॅडेट्सनी कारगिल युद्धातील अनेक पराक्रमाच्या गाथा विद्यार्थ्यासमोर मांडल्या. याप्रसंगी एनसीसी बटालियन नांदेड चे सुभेदार शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शेवटी एनसीसी कॅडेट कृष्णा वाघमारे यांनी आभार मानले यावेळी एनसीसी कॅडेट व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. भारत माता की जय हा नारा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.