https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

डॉ.रघुनाथ शेटे यांना महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रशंसा पुरस्कार घोषित

नांदेड दि:(संपादक राज गायकवाड):उच्च व तंत्रशिक्षण विभाग उच्च शिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मुंबई, यांच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रशंसा पुरस्कार शंकरराव चव्हाण महाविद्यालय,अर्धापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.रघुनाथ बालासाहेब शेटे यांना शैक्षणिक वर्ष 2021- 22 या वर्षातील पुरस्कार घोषित झाला आहे. दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी या पुरस्कारांची घोषणा केली. त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार म्हणजे त्यांनी केलेले विविध सामाजिक कार्याची पावती होय. बेलसर येथील वनराई बंधाऱ्याच्या कामास शासनाकडून मिळालेला एक कोटी रुपयांची अनुदान, सांगवी येथे लोकसभागातून बांधलेल्या वनराई बंधार्‍यास गावकरी लोकांनी लोकवर्गणी करून 15 लाख रुपये जमा करून कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधलेला. तसेच बामणी, मेंढला, देळूब बु. व शहापूर या ठिकाणी राबवलेले स्वच्छता अभियान तसेच हागणंदरी मुक्त गाव या गावात प्रत्येकी 75 ते 80 शौचालय त्यांनी रासेयोच्या माध्यमातून गावात उभे करून गाव हागणदारीमुक्त करून दिले. तसेच शहापूर या गावास राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. अनेक आरोग्य शिबिर, महिला मेळावे,एड्स जनजागरण, रस्ता सुरक्षा अभियान, विशेष शिबिर यासारखे उपक्रम आयोजित करून. यातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी घेतले होते. त्याचेच फलित हा पुरस्कार त्यांना घोषित झालेला आहे. याबद्दल त्यांचे श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेडचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.अशोकरावजी चव्हाण, उपाध्यक्ष उपाध्यक्ष माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण, सचिव तथा माजी राज्यमंत्री मा.डी.पी.सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष मा.अॅड उदयरावजी निंबाळकर, कार्यकारिणी सदस्य नरेंद्रदादा चव्हाण, प्राचार्य डॉ.जी.एन.शिंदे व महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.जे.सी.पठाण ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, डॉ.डी.डी.पवार, डॉ.नागेश कांबळे, मुख्याध्यापक व्ही.एन.देवसरकर, एम.पी.भुस्से, काळे व्ही.डी., प्रा.के.ए.नजम, डाॅ.परमेश्वर पौळ, डाॅ.काजी एम.के. यांच्यासह सहकारी प्राध्यापक मित्रपरिवार यांनी हार्दिक अभिनंदन केले.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704