एम सी आर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘विकास अध्ययन’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू

Uncategorized

नांदेड:
​मराठवाड्याच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर काम करू इच्छिणाऱ्या आणि या क्षेत्रात कुशल व्यावसायिक बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ‘डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासना’तर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ‘विकास अध्ययन पदव्युत्तर पदविका’ (Post-Graduate Diploma in Development Studies) हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विकास अध्ययन हे अभ्यासाचे नवे क्षेत्र असून मराठवाड्याच्या समन्यायी विकासासाठी तसेच विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधींचा लाभ मिळविण्यासाठी या अभ्यासक्रमाचा लाभ मिळेल. प्रादेशिक भाषेत उपलब्ध असणारा हा कदाचित भारतातील पहिलाच वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम ठरत आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.
ग्रामीण विकास, सार्वजनिक धोरण आणि प्रशासकीय क्षेत्रातील करिअरच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम १ वर्षाचा असून यात दोन सत्रांचा समावेश आहे. ​ हे शिक्षण ‘ब्लेंडेड मोड’द्वारे दिले जाणार आहे. यामध्ये ऑनलाइन लेक्चर्स आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्याचा समावेश आहे. ही पद्धत नोकरी करणारे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
​अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक) माध्यमातून शिकवला जाईल. यामध्ये एकूण २० प्रवेशाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. कोणताही पदवीधर विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो आणि यासाठी टी.सी.सी (TCC) ची आवश्यकता नाही, असे अध्यासनाचे समन्वयक डॉ. दिलीप चव्हाण यां़नी कळविले आहे.
हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवा. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी व स्वयंरोजगारासाठी, या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा आणि इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासनाचे समन्वयक
प्रा. दिलीप चव्हाण यांच्याशी ९४२०६४१५१९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
———————-

Share

Related posts

तुमची त्वचा सुंदर आणि स्वस्थ ठेवण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्यायची? मीरा धुळगुंडे आरोग्य सल्लागार

Chief Editor

यशवंत : दैदीप्यमान सुयशाचे शिखर (लेखक:डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor

सेंटर झोन बॉक्सिंग व तायक्वांदो स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाचा दबदबा

Chief Editor

यशवंत महाविद्यालयात अभिरुची फिल्म क्लबच्या वतीने ‘दिठी’ चित्रपटाचा आस्वाद

Chief Editor

आज शहरात आषाढी महोत्सवाचे आयोजन प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांच्या भक्तीमय संगीतसरीचा लाभ घ्यावा – आयोजन विठ्ठल पावडे.

Chief Editor

महामानव लोकशाहीर, साहित्यरत्न, डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

Chief Editor

Leave a Comment