एम सी आर
Uncategorized

महामानव लोकशाहीर, साहित्यरत्न, डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

आज मध्यरात्री पुष्पहार अर्पण व आतषबाजी; उद्या ध्वजारोहण, शाहिरी जलसा, जाहीर सभा, समाजरत्न पुरस्कार आणि गुणवंतांचा गौरव

नांदेड : महामानव, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून १ ऑगस्टपर्यंत विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मातंग समाजासह सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जयंती उत्सवाची सुरुवात ३१ जुलै रोजी रात्री १२ वाजता साठे चौक येथे होणार असून, नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन (IPS) यांच्या हस्ते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यानंतर आकर्षक आतषबाजी करण्यात येणार आहे.
१ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता नांदेड महानगरपालिकेच्या महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर मातंग समाजासह अण्णाभाऊ साठे प्रेमींकडून महामानवास पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात येणार आहे.सकाळी १० वाजता वसमत येथील डॉ. अण्णाभाऊ साठे गायन मंच यांच्यातर्फे शाहिर व्यंकटी सोनटक्के यांचा शाहिरी जलसा आधारित गायनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.दुपारी १ ते ४ या वेळेत जाहीर सभा, व्याख्याने व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य तथा राज्यमंत्री दर्जाचे हेमंत पाटील राहणार असून, उद्घाटन माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, आमदार आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या प्रसंगी प्रा. प्रकाश नाईक (कोल्हापूर) हे डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करणार असून, ज्येष्ठ विचारवंत डॉ. बी. एस. वाघमारे (छत्रपती संभाजीनगर) समाजाला संबोधित करणार आहेत.

कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवकांचा मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच समाजाच्या न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी आयुष्यभर कार्य करणारे दिवंगत कै. मधुकरराव रंगोजी घाटे, कै. धनाजीराव घोडजकर आणि कै. रावसाहेब अंतापूरकर यांना मरणोत्तर ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जाणार आहे.याशिवाय समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते मारोती वाडेकर (नांदेड) आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ.कालिदास तादलापूरकर (छत्रपती संभाजीनगर) यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. डॉ.अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, नांदेड यांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना मानपत्र, बक्षिसे व धनादेशांचे वितरण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते होणार असून, या उपक्रमाचे समन्वयक जिल्हा व्यवस्थापक रमेश पवार आहेत.सायंकाळी ४ ते ५ या वेळेत नांदेड शहरातील विविध प्रभाग तसेच तालुक्यांतून आलेल्या जयंती मंडळांच्या अध्यक्षांचा जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष राजू (ईश्वर अण्णा) जाधव, कार्याध्यक्ष लालबाजी घाटे, उपाध्यक्ष भारत सरोदे, सल्लागार सूर्यकांत तादलापूरकर, सचिव नागोराव आबटवार तसेच अंबादास भंडारे, निलेश तादलापूरकर, सुनीलकुमार मोधेकर, सोनाजी वाघमारे आणि भाग्यश्री करंदीकर यांनी सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तमाम मातंग समाजबांधवांनी कुटुंबासह उपस्थित राहून महामानव डॉ. अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे.

Share

Related posts

प्लॉस्टीकमुक्त कॅम्पस करण्याची शपथ व प्लॉस्टीकची होळी

Chief Editor

संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये २ ऑगस्टला भव्य शोभायात्रा, विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण सत्कार सोहळा

Chief Editor

संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये २ ऑगस्टला भव्य शोभायात्रा विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण सत्कार सोहळा

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये राज्यशास्त्रातील करिअर संधीवर व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

यशवंत महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राद्वारे यश कार्डचे वाटप

Chief Editor

महिलांचे राजकारणातील कर्तृत्व वाखाणण्यासारखे -डॉ.लक्ष्मी पूरणशेट्टीवार

Chief Editor

Leave a Comment