एम सी आर

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे व्याख्यान संपन्न

Uncategorized

नांदेड : नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामार्फत आयोजित “करिअर घडविण्यात इंग्रजी भाषेची भूमिका” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विलास बुवा (इंग्रजी विभागप्रमुख, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय इंदापूर पुणे) हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे जागतिक महत्त्व, उच्च शिक्षणातील उपयुक्तता, तसेच स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या संधी आणि व्यक्तिमत्त्व विकासामध्ये इंग्रजीचे असलेले स्थान तसेच प्रभावी सादरीकरण कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी इंग्रजी विभागप्रमुख डॉ. जीवन मसुरे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. त्यांनी इंग्रजी विभागामार्फत विद्यार्थीकेंद्री राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पुढे बोलताना डॉ. बुवा यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचन, इंग्रजी वर्तमानपत्रांचा अभ्यास, संभाषणाचा सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वास वृद्धी यांवर भर देण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजीची भीती न बाळगता ती आत्मसात करण्याचा निर्धार करावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुग्रीव फड होते. आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी इंग्रजी विभागाचे अभिनंदन करून इंग्रजी भाषा ही केवळ एक विषय नसून जागतिक ज्ञानाशी जोडणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध प्रश्न विचारले. संवादात्मक पद्धतीने पार पडलेल्या या सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. याप्रसंगी डॉ. इर्शाद खान, डॉ. चंद्रशेखर येंगडे, प्रा. के. जे. कांबळे यांच्या सह महाविद्यालयातील इतर प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप काळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी इंग्रजी विभागातील डॉ. गीता भोजने यांच्या सह संभाजी तोटरे, कृष्णा आदींनी परिश्रम घेतले.

Share

Related posts

आज शहरात आषाढी महोत्सवाचे आयोजन प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांच्या भक्तीमय संगीतसरीचा लाभ घ्यावा – आयोजन विठ्ठल पावडे.

Chief Editor

वटसावित्री पौर्णिमा उत्साहात; महिलांनी पतीच्या दीर्घायुष्य व कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी केले व्रत

Chief Editor

यशवंत ‘मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश

Chief Editor

यशवंत ‘ मधील रोहिणी सुधाकर चव्हाण यांना प्राणीशास्त्रात पीएच.डी.

Chief Editor

बंजारा समाज जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल

Chief Editor

नांदेड पोलीसांची धडक कारवाई : ८४ ‘फटाका सायलेंसर’ जप्त, रोड रोलरने नष्ट

Chief Editor

Leave a Comment