एम सी आर
Uncategorized

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची यशोगाथा; पोलिस भरतीत दोन विद्यार्थिनींची निवड

परभणी:
प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आईवडिलांच्या कष्टाचे चीज करत आर्वी येथील कु. मायावती पंढरीनाथ कांबळे व परभणी येथील साक्षी गणेश मोरे यांनी पोलिस भरतीत महिला शिपाई पदावर यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत, शिक्षक, प्राध्यापक, प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन आणि जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मायावती व साक्षी यांनी मिळवून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. या निमित्ताने महाविद्यालयात त्यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना मायावती व साक्षी यांनी आपले परिश्रम, अभ्यासाच्या तयारी व मैदानी सरावाची माहिती दिली.
मायावती कांबळे व साक्षी मोरे यांनी आपले पदवीचे शिक्षण परभणी येथील कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय येथे पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षण एम. ए. इतिहास ह्या विषयात पूर्ण केले तर कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय येथे सुरू असताना महाराष्ट्र उच्च शिक्षण विभागाचा करियर कट्टा ह्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता, तसेच महाविद्यालयात नियमित होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या तज्ञ मार्गदर्शनाचा लाभ झाला.
शिक्षणाबरोबरच खेळाची आवड आणि पोलीस दलात सेवा करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत त्यांनी परभणी येथे प्रशिक्षण घेतले. कठोर सराव आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर अखेर परभणी येथे पार पडलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत त्यांनी महिला पोलिस भरती २०२६ मध्ये यश मिळवले.

मायावती व साक्षीच्या या यशाबद्दल नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. हेमंतराव जामकर, उपाध्यक्ष मा. अँडव्होकेट किरणराव सुभेदार, सचिव मा. विजयराव जामकर व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे, इतिहास विभागप्रमुख डॉ. महेश जाधव, डॉ. प्रवीण नादरे, प्रा. जयश्री आदमाने व सर्व प्राध्यापक कर्मचारी व वर्गमैत्रींणीनी तिचे अभिनंदन केले असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share

Related posts

यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘युवा कट्टा’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

Chief Editor

शांती ब्रह्म स्वरूप: जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज

Chief Editor

मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के पालकमंत्री अतुल सावे प्रशासनाच्या संपर्कात; परिस्थितीवर लक्ष

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

दिल्लीचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा,वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत

Chief Editor

Leave a Comment