एम सी आर

हिंद दी चादर’ या भव्य समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी दोन दिवस उल्लेखनीय सेवाकार्य केले.

Uncategorized

विद्यापीठातील रासेयोच्या स्वयंसेवकांकडून सेवाकार्य

नवीन नांदेड, ता. २५

(बातमीदार) : श्री गुरू तेगबहादूर

साहिबजी यांच्या शहिदी शताब्दीनिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ या भव्य समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी दोन दिवस उल्लेखनीय सेवाकार्य केले.

कार्यक्रमाच्या दोन्ही दिवशी रासेयोच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी लंगरसेवा, जूते घर सेवा, तसेच परिसर स्वच्छता केली. तसेच भाविकांना स्वयंशिस्त व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन करून शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली. भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम

यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी सेवाभावी कार्य करून आपली जबाबदारी समर्थपणे निभावली. प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी भेट दिली. तसेच या कार्यक्रमाच्या जनजागरण समितीमध्ये कार्य करताना कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी मोलाची भूमिका बजावली.

रासेयो स्वयंसेवक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रासेयो संचालक डॉ. मारुती गायकवाड, रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. भागवत पस्तापुरे, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. अरुणा शुक्ला, डॉ. आशा मेश्राम यांची उपस्थिती होती.

Share

Related posts

पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आवश्यक – डॉ. गीता लाठकर

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये दि. ३ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पावर व्याख्यान

Chief Editor

यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor

दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत

Chief Editor

विद्यापीठात ‘रॅगिंग प्रतिबंध व पोक्सो’ विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृतीसह सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्मितीवर भर

Chief Editor

विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी OJT व Internship महत्त्वपूर्ण : डॉ. अशोक महाजन

Chief Editor

Leave a Comment