एम सी आर

विद्यापीठात ‘रॅगिंग प्रतिबंध व पोक्सो’ विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृतीसह सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्मितीवर भर

Uncategorized

नांदेड, दि. १२ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वार्षिक सामान्य किमान कार्यक्रमांतर्गत तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्या सहकार्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ‘रॅगिंग प्रतिबंध व पोक्सो’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी विकास विभाग आणि विद्यार्थी विकास कक्ष समितीच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती निर्माण करणे, रॅगिंगसारख्या गैरप्रकारांना प्रतिबंध करणे तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, संवेदनशील आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. मनोहर चासकर होते. प्रमुख उपस्थितीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, डॉ. संगीता माकोने आणि विद्यापीठाचे विधी अधिकारी विनायक भोसले यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडचे सचिव मा. शरद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी रॅगिंगविरोधी कायदे, रॅगिंगचे विद्यार्थ्यांच्या मानसिक व शैक्षणिक जीवनावर होणारे परिणाम, रॅगिंगला प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी तसेच विद्यार्थ्यांचे कायदेशीर अधिकार व जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर माहिती दिली. कोणत्याही प्रकारच्या रॅगिंगला प्रोत्साहन न देता त्याविरोधात सजगपणे भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच ॲड. एम. आर. मुधोलकर, ॲड. शेख शकील आणि ॲड. वैद्य यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ‘रॅगिंग प्रतिबंध’ आणि ‘पोक्सो’ कायद्याविषयी सखोल कायदेविषयक मार्गदर्शन केले. पोक्सो कायद्याची पार्श्वभूमी, बालकांचे संरक्षण, लैंगिक अत्याचाराचे विविध प्रकार, कायद्यातील तरतुदी, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून माहिती दिली. कायद्याचे ज्ञान हे केवळ अधिकारांसाठी नव्हे, तर स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठीही आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती करून घेत त्याचा सकारात्मक वापर करावा तसेच विद्यापीठातील शिस्त, परस्पर सन्मान आणि संवेदनशीलता यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. कायदेविषयक जनजागृतीचे असे उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारांबरोबरच कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास विद्यापीठ परिसरातील विविध शैक्षणिक संकुलांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांशी संवाद साधत रॅगिंग प्रतिबंध, पोक्सो कायदा, तक्रार निवारणाची प्रक्रिया आणि कायदेशीर मदत यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांचे शंकानिरसन केले.

यावेळी डॉ. नंदकुमार बोधगीरे, डॉ. बाबूराव जाधव, डॉ. अर्चना साबळे, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. सुनीता पाटील, डॉ. शालिनी कदम, डॉ. अरविंद सरोदे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी मांडली. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदेविषयक जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारोती गायकवाड यांनी मानले.

विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच रॅगिंग, लैंगिक अत्याचार आणि अन्य गैरप्रकारांविरोधात संवेदनशीलता वाढविण्याच्या दृष्टीने हे मार्गदर्शन शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Share

Related posts

पुलगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नांदेड जिल्ह्याच्या खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी

Chief Editor

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन

Chief Editor

नांदेड पोलीसांची धडक कारवाई : ८४ ‘फटाका सायलेंसर’ जप्त, रोड रोलरने नष्ट

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज व्याख्यान*

Chief Editor

व्यायाम करणे म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे.:मीरा धुंळगुडे

Chief Editor

बंजारा समाज जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल

Chief Editor

Leave a Comment