एम सी आर

बंजारा समाज जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल

Uncategorized

नांदेड:

बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिंतूर येथून दि.१५ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू करण्यात आलेली “बंजारा समाज जोडो यात्रा” दि. ८ मार्च २०२६ रोजी नांदेड शहरात दाखल झाली.या यात्रेचे प्रमुख संघर्ष योद्धा विनोद आडे यांच्या नेतृत्वाखाली यात्रा पुढे सुरू असून नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांच्या वतीने यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.या यात्रेत राजूसिंघ जाधव, अ‍ॅड.सुभाष जाधव,अ‍ॅड.अंकुश बर्डे, पंढरी आडे,अ‍ॅड.पी.एम.चव्हाण आदी समाज बांधव सहभागी झाले आहेत. समाजाच्या हक्काच्या मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली असून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान,दि.८ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर “एकच मिशन – एसटी आरक्षण” या घोषवाक्याखाली मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.या मेळाव्यास जास्तीत जास्त बंजारा समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजूसिंघ जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Related posts

बेरोजगार तरुणांसाठी २७ मार्च रोजी रोजगार मेळावा; २००० पेक्षा अधिक रिक्त पदांची संधी; डॉ. यशवंत कलेपवार

Chief Editor

कै.‌सौ.‌ कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील वाड्मय मंडळाच्या वतीने कमल वार्षिकांक विमोचन

Chief Editor

मालमत्तेच्या वादातून जीवघेणा हल्ला; पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप

Chief Editor

डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांना न्यूयॉर्कमध्ये ग्लोबल ग्रीन टीचर अवॉर्ड २०२६

Chief Editor

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

Chief Editor

यशवंत ‘युवकांचा .डी.पी. सावंत यांच्या उपस्थितीत द्विमार्गी ऑनलाईन संवाद

Chief Editor

Leave a Comment