एम सी आर

अभिरुची आस्वाद’ मध्ये ऑस्करसाठी नामनिर्देशित झालेल्या ‘कवी’ या लघुपटाचे प्रदर्शन

Uncategorized

नांदेड :
स्वातंत्र्याचा अर्थ कळतो, जेव्हा कोणाचं बालपण कैद झालेलं पाहतो,’ असा अंतर्मुख करणारा संदेश देणारा ‘कवी’ हा लघुपट पाहून विद्यार्थी भारावून गेले. निमित्त होते यशवंत महाविद्यालयातील ‘अभिरुची आस्वाद’चे.राष्ट्रीय सणांच्या दिवशी विशेष चित्रपट दाखवण्याची ‘अभिरुची फिल्म क्लब’ची ही परंपरा मागील सहा वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे.त्याच परंपरेचा भाग म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रेग हेल्वी यांनी दिग्दर्शित केलेला आणि ऑस्करसाठी नामनिर्देशित झालेला ‘कवी’ हा लघुपट दाखवण्यात आला.

संविधानाचा आणि प्रजासत्ताकाचा स्वीकार करताना आपण सामाजिक आणि आर्थिक न्यायाचे तसेच दर्जाचे व संधीच्या समानतेचे अभिवचन दिले होते.या अभिवचनाच्या पूर्ततेची पडताळणी कितपत झाली,हे आपण वेळोवेळी तपासून पाहायला हवे. त्याचाच एक भाग म्हणून आज भले आपण शैक्षणिक दृष्ट्या सुस्थितीत असू,पण खूप मोठा वर्ग अगदी प्राथमिक स्वरूपाच्या शिक्षणापासून देखील वंचित आहे. अशावेळी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी आपणाला काय करता येईल? यावर विचार करायला लावून प्रस्तुत लघुपटाने भारतातील बालमजुरीचे कटू वास्तव अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांना जागृत केले.

यशवंत महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात अभिरुची फिल्म क्लब व वाचन कट्ट्याच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता आणि अभिव्यक्तीची सवय विकसित होते, असे त्यांनी नमूद केले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत डॉ.विजय भोसले यांनी आपल्या मुलाच्या (सर्वेश विजय भोसले)बाराव्या वाढदिवसानिमत्त वाचन कट्ट्यासाठी विविध विषयांवरील एकूण बारा पुस्तके भेट देऊन एक प्रेरणादायी उदाहरण पेश केले.या पुस्तक भेटीचे विद्यार्थ्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी उपक्रमाचे समन्वयक डॉ. विश्वाधार देशमुख यांनी प्रास्ताविकात उपक्रमामागील भूमिका विशद केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी क्षीरसागर तर आभार प्रदर्शन शुभम राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘अभिरुची फिल्म क्लब’च्या अध्यक्ष हिंदवी जाधव, उपाध्यक्ष तबस्सूम शेख,जर्मिन शेख, पूजा तोटेवाड,गोदावरी कानशुक्ले, आयुष सोनकांबळे,प्रणिता तेलंग,केतन कपाटे इ.विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.सुट्टीचा दिवस असूनही प्रस्तुत आस्वादासाठी कला,वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Share

Related posts

नांदेड जिल्ह्याचा किकबॉक्सिंगमध्ये दबदबा; २३ खेळाडू राज्यस्तरासाठी पात्र

Chief Editor

लोकमत नांदेड गौरव सोहळा २०२६ : आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. अर्जुन शेळके यांचा सन्मान

Chief Editor

बारावीनंतर करिअरची नवी दिशा; स्वावलंबी होण्यासाठी विद्यापीठाची सुवर्णसंधी

Chief Editor

यशवंत ‘ मधील रामेश्वर जाधव यांना अर्थशास्त्रात पीएच.डी. प्रदान

Chief Editor

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने विद्यापीठात ‘पीएच.डी. एंड-टू-एंड’ सॉफ्टवेअर पोर्टलचा शुभारंभ

Chief Editor

फार्मा शिक्षक क्रिकेट स्पर्धेत स्वामी विवेकानंद फार्मसीचा संघ विजेता

Chief Editor

Leave a Comment