एम सी आर

नांदेड जिल्ह्याचा किकबॉक्सिंगमध्ये दबदबा; २३ खेळाडू राज्यस्तरासाठी पात्र

Uncategorized

“राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्याच्या २३ खेळाडूंची निवड”
नांदेड: दिनांक ७ मे२०२६
पुणे येथील पुलगाव येथे ८ ते १० मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील २३ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणात खेळाडू सहभागी होणार असून नांदेड जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
नांदेड जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा १२ एप्रिल रोजी पार पडली होती. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. सदर स्पर्धा पुलगाव, पुणे येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.


राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे —
आयुषी ढगे, स्तुती मेंडकीकर, हृदया जैस्वाल, हरगून कौर, जैनब तन्वीश, सिमरन शेख, कायरा बिसेन, इरफान खान, ज्योतिरादित्य मुठे, मोहम्मद अब्दुलरेहमान, मोहम्मद अब्दुल्ला, जयदीप मोरे, तेजस सावते, गणराज शीरमेवार, विनयकुमार श्रीराम, भार्गवी भंडारे, यश खेडकर, अर्णव कुमठेकर, व्यंकट मुंडे, कुणाल वाघमारे, प्रिन्स गायकवाड, सुखवीरसिंग बुटार आणि सतविंदर सिंग वसिर.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक दिपा गवळे व गणेश सावते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच ब्लेझ कॉम्बॅट अँड फिटनेस क्लबचे संचालक तथा नांदेड जिल्हा किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव किरण गवळे यांनी सर्व निवड झालेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.

Share

Related posts

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सांगडीतूनच ऊर्जा स्त्रोतांची पुनर्निर्मिती शक्य – प्रो. री-ची मुराकामी

Chief Editor

आधुनिक व पुरोगामी :डॉ. व्ही. एन. इंगोले’. लेखक- डॉ. अजय गव्हाणे

Chief Editor

यशवंत मध्ये “भारत एन्व्हायरमेंट प्रोग्राम सप्ताहाचे” आयोजन

Chief Editor

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणींना वैमानिक होण्यासाठी “गिविंग विंग्स टू फ्लाई “उपक्रम.

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये रसायनशास्त्र विभागात ‘क्युरी क्लब’चे थाटात उद्घाटन

Chief Editor

नांदेडमध्ये भरदिवसा खून; इंदिरानगर परिसरात खळबळ

Chief Editor

Leave a Comment