एम सी आर

यशवंत मध्ये “भारत एन्व्हायरमेंट प्रोग्राम सप्ताहाचे” आयोजन

Uncategorized

नांदेड:(दिनांक 22 एप्रिल 2026) यशवंत महाविद्यालय नांदेड यांनी रिसर्च Heights Foundation यांच्या मार्गदर्शनाखाली व EPTRI यांच्या सहकार्याने Earth Day निमित्त आयोजित भारत एन्व्हायरमेंट प्रोग्राम-भारत सस्तेनेबल कॅम्पस मिशन 2026 मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे
महाविद्यालयाच्या वतीने भारत एन्व्हायरमेंट प्रोग्राम सप्ताहाचे दिनांक 22 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध अशा आठ समितीची निर्मिती करण्यात आलेली असून यामध्ये डॉ. आर. जी. चिल्लावार डॉ. बी. बालाजीराव डॉ. एम. एम. व्ही. बेग डॉ. के एम इंगोले डॉ. आर. एल सोनटक्के, प्रा. एस. बी. राऊत, प्रा. प्रियंका सिसोदिया, डॉ. पी. आर मिरकुटे व डॉ. एम. डी. अंभोरे यांचा समावेश आहे. तर डॉ. एल. व्ही. पदमाराणी राव (समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता कक्ष) ह्या वरील समित्यांना समन्वय करतील.
या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा माझी प्र-कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
अर्थ वीक(22-29 एप्रिल 2026) दरम्यान पर्यावरण जनजागृती, जबाबदार वर्तन व विद्यार्थी सहभाग, विविध सस्तेनेबिलिटी उपक्रम राबविण्यात येणार आहेत
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग नोंदवणे त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन व हवामान बदलाची बांधिलकी निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट असेल
हा उपक्रम विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट गोल्स (SDG 2030) उद्दिष्टांना पूरक आहे. यशवंत महाविद्यालय नांदेड शाश्वत विकास व विद्यार्थी केंद्रित सामाजिक बांधिलकी दर्शवितो

Share

Related posts

डिजिटल युगात हिंदीतून रोजगाराच्या अमर्याद संधी -डॉ. कोमलकुमार परदेशी

Chief Editor

माझ्या आई-बाबांच्या अमृतमहोत्सवपूर्ती व 77 व्या वर्षातील पदार्पणानिमित्त एका मुलाच्या मनोगतातून..डॉ. विजय नागोराव भोसले

Chief Editor

यशवंत ‘मध्ये टीबी मुक्त भारत अभियान जनजागृती संपन्न

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘आयरिन्स व इन्फ्लिबनेट सेवा’ राष्ट्रीय कार्यशाळा

Chief Editor

स्वामी विवेकानंद संकुलात रक्तदान शिबिराचे आयोजन

Chief Editor

हनुमान पेठ, नांदेड-भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक सुमित मुथा यांची निवड.

Chief Editor

Leave a Comment