एम सी आर

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘आयरिन्स व इन्फ्लिबनेट सेवा’ राष्ट्रीय कार्यशाळा

Uncategorized

नांदेड:
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ मार्च, २०२६
 
उच्च शिक्षण क्षेत्रातील संशोधक आणि प्राध्यापकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी ‘आयरिन्स व इन्फ्लिबनेट सेवा’ विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा दि.१६ मार्च, २०२६ रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठ आणि इन्फ्लिबनेट सेंटर, गांधीनगर (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
“युजर अवेअरनेस प्रोग्राम ऑन आयरिन्स अँड इन्फ्लिबनेट सर्व्हिसेस फॉर स्कॉलरली कम्युनिटीज” या विषयावर आधारित या कार्यशाळेत संशोधकांना जागतिक स्तरावरील संशोधन साधनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. ‘आयरिन्स’ (IRINS) हे
भारतीय संशोधकांच्या शोधनिबंध व शैक्षणिक कार्याची नोंद ठेवणारे विनामूल्य वेब-पोर्टल
असून, या माध्यमातून संशोधकांना त्यांच्या कार्याला जागतिक ओळख
मिळवून देणे आणि शैक्षणिक नेटवर्क विस्तारण्यास मदत होते.
कार्यशाळेत इन्फ्लिबनेट केंद्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ
‘आयरिन्स’, वन नेशन वन सबस्क्रिप्शन,
विद्वान व शेर्नी पोर्टल, शोध-चक्र तसेच ऑर्किड
या डिजिटल प्लॅटफॉर्मची माहिती देणार आहेत. ही कार्यशाळा सर्व विद्याशाखांतील सहाय्यक
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक,
नॅक-आयक्युएसी समन्वयक, ग्रंथपाल आणि सक्रिय संशोधकांसाठी
उपयुक्त ठरणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर
केवळ १०० ते १२० सहभागींची निवड करण्यात येणार असून, कोणतेही नोंदणी शुल्क आकारले
जाणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ मार्च, २०२६ आहे. नोंदणी करताना प्राचार्य,
विभागप्रमुख किंवा संशोधन मार्गदर्शक यांचे अधिकृत शिफारसपत्र जोडणे
आवश्यक आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू
डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार तसेच इन्फ्लिबनेटच्या
संचालिका प्रो. देविका पी. मदल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. ज्ञान
स्रोत केंद्राचे प्र. संचालक डॉ. जगदीश नरहरराव कुळकर्णी हे कार्यक्रमाचे समन्वयक आहेत.
इच्छुकांनी https://irins.org/irins-outreach या लिंकवर नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ज्ञान स्रोत केंद्राचे प्र. संचालक
किंवा डॉ. अरुण हंबर्डे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले
आहे.
—————————

Share

Related posts

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अनुज्ञेय करण्यात आलेल्या तासिका तत्त्वावरील पदांच्या NOC यावर्षी ही कायम ठेवण्याची मागणी

Chief Editor

लोकशाही बळकट करण्यासाठी सक्षम प्रशासक घडणे काळाची गरज – डॉ. दीपक वाघमारे

Chief Editor

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी व्यासपीठ – कुलसचिव डॉ. डी. डी. पवार

Chief Editor

अभिरुची आस्वाद’ मध्ये ऑस्करसाठी नामनिर्देशित झालेल्या ‘कवी’ या लघुपटाचे प्रदर्शन

Chief Editor

समाज कल्याण निरीक्षकांच्या पदोन्नतीची कोंडी दूर करण्याची मागणी नव्या आकृतीबंधातून दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सोडविण्याची अपेक्षा

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात क्रीडा संचालकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेला उत्साहात प्रारंभ

Chief Editor

Leave a Comment