गडचिरोली,प्रतिनिधी :-
महाराष्ट्र शासन विजनियमक आयोगाने एक एप्रिल पासून अडीच रुपये प्रति युनिट दरवाढ करणार करणार आहे.या विद्युत दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीचे आंदोलन आज स्थानिक इंदिरा चौकात करण्यात आले.
विद्युत दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला जिल्हा संघटिका छाया ताई कुंभारे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलाच्या उपस्थितीत गांधी चौक गडचिरोली येथे निषेध करण्यात आले.
या प्रसंगी विद्युत दर कमी करा नाही तर खुर्च्या खाली करा, महाराष्ट्र शासनाचा निषेध असो असे नारे लावण्यात आले. विद्युत दर वाढ कमी झाली नाही तर शिवसेना महिला आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.
या आंदोलनात महिला आघाडी चे जोत्सना राजूरकर, मंजुळा पदा, देवकी कंकड्यालवार, स्वाती दासेवर, आरती खोब्रागडे, स्मिता नैताम, सीमा पराशर, नूतन कुंभारे, संध्या हेमके, धनश्री पवार, शारदा वणकर, वंदना वाडगुरे, आशा देशमुख, निकिता वडगुरे, सुमन सोनटक्के, कमलाबाई मोहुरले, चित्रा निकुरे, श्वेता शेंडे, ममता मेश्राम, नैना शेंडे, श्रीपदा मुसद्दिवर, शशिकला मुसद्दीवर, सूमीत्रा पारधी, नैना शेंडे, शांता मुंटावर, शशीकला निकेकार, नैना सयाम, रोहिणी दीक्षित व शेकडो महिला उपस्थित होत्या.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.