गडचिरोली,प्रतिनिधी :-
भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची वाढत चाललेली लोकप्रियता आणि हिडनबर्ग संस्थेने उघड केलेल्या अदानी समूहाच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासंदर्भात संसदेत काँग्रेस नेते राहुल गांधी सतत आवाज उचलत असताना त्यांचा आवाज दाबण्याकरिता नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने राहुल गांधी यांच्यावर बिन बुडाचे आरोप करून सत्तेचा दुरुपयोग करत खासदारकी रद्द करण्याचा षडयंत्र केला, याचे निषेध म्हणून राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ व नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या निषेधार्थ आणि अदानी समूहाच्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय चौकशीच्या प्रमुख मागणी करिता गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने भाजपच्या हुकूमशाही धोरना विरोधात भव्य मशाल मार्च महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजीत कोवासे यांच्या मार्गदर्शनात व युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव नितेश राठोड यांच्या नेतृत्वात काढण्यात आले.
या मशाल मार्चला जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे सचिव भावनाताई वानखेडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, माजी नगरसेवक रमेश चौधरी, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले परिवहन सेल अध्यक्ष, सहकार सेल उपाध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, ढिवरू मेश्राम, गडचिरोली विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जिल्लेवार, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव जिल्हा प्रतीक बारसिंगे, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष कमलेश खोब्रागडे, जावेद खान, युवक काँग्रेसचे आकाश मोहुर्ले, सचिन निखूरे, अमृत कंकालवर, माजीद सय्यद, महादेव भोयर, गडचिरोली युवक काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष घनश्याम मुरवतकर, निखिल खोब्रागडे, चोखाजी भांडेकर, राजाराम ठाकरे,सह मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.