https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
राजकीय

सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने किशनराव रावणगावकर यांचा भव्य सत्कार.

नवीन नांदेड. दि.२१:महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष मा. आ. नानाभाऊ पटले व महाराष्ट्राचे लाडके लोकनेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या निर्देशानुसार जिल्हा काँग्रेस सामाजिक न्याय जिल्हा नांदेड च्या जिल्हा महासचिव पदी सिडको भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा काँगेस पक्षाचे ज्येष्ठ सक्रिय कार्यकर्ते किशनराव रावणगावकर सर यांची निवड करण्यात आली. सदरील निवडीचे पत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी माजी मंत्री. डी. पी. सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अमर भाऊ राजुरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलिकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेंद्र घोडजकर, डॉ. श्रावण रॅपनवाड, सामजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गंगाधर सोनकांबळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील निवडी बद्दल किशनराव रावणगावकर यांचा सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सिडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते माजी नगरसेवक प्र.भी.ना. गायकवाड, नामदेव पदमने
प्रा. शशिकांत हटकर, प्रभू यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704