मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश आढावा बैठकीचे आयोजन
नांदेड विभागातील केंद्रप्रमुख/ केंद्रसंयोजक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

मी
नांदेड (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला १ जून २०२४ पासूनसुरुवात झाली आहे.
या प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शन संदर्भात नांदेड विभागीय केंद्रातील केंद्र प्रमुख,/ केंद्र संयोजक यांच्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन दिनांक २५ जुलै गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता नांदेड शहरातील कुसुम सभागृह व्हीआयपी रोड, नांदेड येथे करण्यात आले आहे.
या बैठकीस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, नोंदणी विभागाचे उप कुलसचिव डॉ. मनोज घंटे, शैक्षणिक संयोजक डॉ. दयानंद
हत्ती अंभीरे आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या आढावा बैठकीस नांदेड विभागीय केंद्रातील विविध अभ्यास केंद्राचे केंद्रप्रमुख / केंद्र संयोजक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार यांनी केली आहे