ताज्या घडामोडी

कला क्षेत्रात सातत्य, मेहनत ठेवल्यास नक्कीच यश मिळते- सिनेकलावंत संकर्षण कऱ्हाडे

ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा

नांदेड :प्रतिनिधी
कला क्षेत्रात करिअर करायची असेल तर कलावंतांनी अष्टपैलू राहिले पाहिजे. कलावंतामध्ये सातत्य, मेहनत असावी लागते. कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्राचे मैदान सोडून जाऊ नये, यश आणि अपयश मनाला लावून घेऊ नये, अपयश हे आपल्यासाठी आवाहन आहे, असे मत सिने कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवातून घडलेला मी कलावंत असून, मी मराठवाड्याचा कलावंत असल्याचे माझी ओळख आहे. मुंबईमधील आणि मराठवाड्यातील कलाकारांमध्ये फरक आहे. मराठवाड्यातील कलावंत प्रामाणिक आणि साधे असतात असा माझा अनुभव असल्याचे सिनेकलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र.सचिव डॉ. डी. डी. पवार, शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सारेगमप प्रसिद्ध गायक अनिकेत शराफ, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, नरेंद्र दादा चव्हाण, डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एन. मोरे. इंजि. नारायण चौधरी, डॉ. सुरेखा भोसले, डॉ. संतराम मुंडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, स्वागताअध्यक्ष डॉ. बालाजी गिरगावकर, डॉ. शिवानी हंबर्डे, प्राचार्य सुनील हंबर्डे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले की, जीवनात यश अपयश येतच असतात त्यावर मात करून पुढे जावे लागते. विद्यार्थ्यांनी अगोदर ध्येय निश्चित करून जीवनाची दिशा ठरवावी, ज्ञानवर्धिगत ज्ञानवृद्धी करा कठोर परिश्रम करा यश नकीच मिळेल असे ते म्हणाले.
युवक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सल्लागार समितीचे सदस्य डॉ. कमलाकर चव्हाण, डॉ. एम. आर. जाधव, डॉ. गजानन पाटील, डॉ. रामचंद्र भिसे, डॉ. बालाजी भंडारे, डॉ. विजया साखरे, डॉ. क्रांती मोरे, डॉ. राजपालसिंह चिखलीकर, डॉ. यादव सूर्यवंशी, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. भारत शिंदे, डॉ. सतीश देशपांडे, डॉ. दत्ता मेत्रे, डॉ. महेश पेंटेवार, डॉ. दिलीप गुंजरगे, डॉ. संगीता मुंडे, डॉ. पंजाब शेरे, डॉ. गौरव जवळेकर, डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. गोविंद रामदेणेवार, डॉ. शिल्पा शेंडगे, डॉ. संजय जगताप, डॉ. शिवाजी बलोरे, डॉ. सुरेश म्हेत्रे, डॉ. प्रकाश शिंदे, डॉ. डी. आर. माने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विश्वाधार देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शिवानी हंबर्डे यांनी मानले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.